'एलबीटी'प्रश्नी आज मुख्यमंत्र्यांची भेट

By Admin | Updated: December 16, 2014 00:40 IST2014-12-16T00:35:57+5:302014-12-16T00:40:35+5:30

कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत ‘एलबीटी’मधून १ एप्रिल ते ६ डिसेंबर २०१४ अखेर ५५ कोटी २६ लाख ११ हजार ७९९ रुपये जमा

'LBT' question today Chief Minister's visit | 'एलबीटी'प्रश्नी आज मुख्यमंत्र्यांची भेट

'एलबीटी'प्रश्नी आज मुख्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूर : स्थानिक संस्था कर अर्थात ‘एलबीटी’ हा जाचक कर रद्द व्हावा, महापालिकेकडून व्यापाऱ्यांवर सुरु असलेल्या कारवाईप्रश्नी उद्या, मंगळवारी ‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’ (फाम)चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे भेटणार आहे. दरम्यान, कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत ‘एलबीटी’मधून १ एप्रिल ते ६ डिसेंबर २०१४ अखेर ५५ कोटी २६ लाख ११ हजार ७९९ रुपये जमा झाले आहेत.
राज्यातील भाजप सरकारने ‘एलबीटी’ घालविण्याचे आश्वासन दिले होते. दुसरीकडे, विनापर्याय ‘एलबीटी’ रद्द करावा अथवा मूल्यवर्धित कर (व्हॅट)मध्ये एक ते दीड टक्का वाढीची मागणी व्यापारी करीत आहेत. सरकार मात्र ‘एलबीटी’ऐवजी ‘टर्न ओव्हर टॅक्स’आणूया का, या विचारात आहे. परंतु, व्यापाऱ्यांचा नवीन करप्रणाली विरोध आहे. गुरनानी, सांगलीचे खासदार संजय पाटील व नागपूरचे दीपेन अग्रवाल यांचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे कोल्हापूर व्यापारी व उद्योजक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)


अडीच लाखांचा दंड; ५० व्यापाऱ्यांची बँक खाती सील
‘एलबीटी’ न भरल्याप्रकरणी व्यापाऱ्यांकडून महापालिकेने सुमारे अडीच लाख रुपये जमा केले आहेत, तर ५० व्यापाऱ्यांची बँक खाती सील केली आहेत. आता २५० व्यापाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. त्याची २३ व २४ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.



‘जीएसटी’ला आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार ?
देशात एकच कर असावा, त्यासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) २०१६ ला लागू करू, असे केंद्र सरकारने सांगितले होते; पण त्याची अंमलबजावणी दोन वर्षे लांबण्याच्या शक्यतेमुळे व्यापारी बुचकळ्यात पडले आहेत.

Web Title: 'LBT' question today Chief Minister's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.