‘एलबीटी’प्रश्नी आता बुधवारी बैठक
By Admin | Updated: March 23, 2015 00:42 IST2015-03-22T22:39:34+5:302015-03-23T00:42:01+5:30
. मात्र, राज्यातील २६ महापालिकांमधील व्यापाऱ्यांची एक एप्रिल २०१५ पासून एलबीटी रद्द व्हावा व त्याबदल्यात मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) दीड ते दोन टक्का वाढ करावी, अशी मागणी आहे.

‘एलबीटी’प्रश्नी आता बुधवारी बैठक
कोल्हापूर : एलबीटीप्रश्नी आज, सोमवारी ‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’ (फाम) मुंबईच्या कार्यालयात होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली असून, ही बैठक बुधवारी (दि. २५) ठाणे येथे होणार आहे. बैठकीत ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी हे मार्गदर्शन करणार असून, २६ महापालिकांतील व्यापारी प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत.विधानसभा अधिवेशनात चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलबीटी रद्द करू; पण तो एक आॅगस्टपासून, अशी घोषणा केली होती. मात्र, राज्यातील २६ महापालिकांमधील व्यापाऱ्यांची एक एप्रिल २०१५ पासून एलबीटी रद्द व्हावा व त्याबदल्यात मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) दीड ते दोन टक्का वाढ करावी, अशी मागणी आहे. परंतु, सरकारने एलबीटीप्रश्नी अभ्यास करण्यासाठी अजून साडेचार महिने घेतले आहेत. या सरकारने विश्वासघात केल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची असल्याचे जिल्हा उद्योजक व महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी सांगितले.