लक्ष्मीपुरीत जुगारअड्ड्यावर छापा
By Admin | Updated: July 8, 2014 00:59 IST2014-07-08T00:56:43+5:302014-07-08T00:59:19+5:30
पाचजणांना अटक

लक्ष्मीपुरीत जुगारअड्ड्यावर छापा
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील जुना कांदा-बटाटा मार्केट परिसरात उघड्यावर तीन पानी जुगार खेळताना पाच जणांना आज, सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, लक्ष्मीपुरी जुना कांदा-बटाटा मार्केट परिसरात उघड्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुंडाविरोधी पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली असता पाच-सहा तरुण जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक नावे अशी,
संशयित किरण सदाशिव सुगते (वय ४०, रा. यादवनगर), भरत महिपती वाडकर (३२, रा. हणबरवाडी), अंकुश पांडूरंग भिऊगडे (३५, रा. खामकरवाडी, ता. राधानगरी), सुरेश सखाराम पाटील (४०, रा. देवाळे, ता. करवीर), नानासो आप्पासो पुजारी (४०, रा. वाशी, ता. करवीर). नामदेव कांबळे (रा. कोथळी, ता. राधानगरी) हा पसार आहे.