शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

‘फेअरडील’साठी वकील खर्च ७८ लाख

By admin | Updated: December 3, 2015 01:14 IST

भूपाल शेटे : महापालिकेला दाव्यासाठी नाहक भुर्दंड; नागरिकांच्या पैशाची लूट

कोल्हापूर : वीस वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराच्या जकात वसुली ठेकाप्रश्नी वादग्रस्त ठरलेल्या फेअरडील कन्स्ट्रक्शन कंपनीने महापालिकेवर दाखल केलेल्या दाव्यावर महापालिकेचा लवाद न्यायालय व वकील खर्च असा सद्य:स्थितीपर्यंत सुमारे ७८ लाख ५९ हजार रुपये बेकायदेशीरपणे खर्च झाला आहे. महापालिकेचे इस्टेट अधिकारी राम काटकर हे मुंबई येथे सुनावणीसाठी जात असूनही ते उच्च न्यायालयात हजर न राहिल्याने प्रत्येक तारखेस महापालिकेला सुमारे एक लाख रुपयांचा भुर्र्दंड पडत असल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक भूपाल शेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ही महापालिकेची, पर्यायाने जनतेच्या पैशांची या अधिकाऱ्यांमार्फत राजरोसपणे लूट सुरू असल्याचा आरोपही शेटे यांनी यावेळी केला. या प्रकरणी आयुक्तांनी लक्ष घालण्यासाठी त्यांना निवेदन देणार आहे. अन्यथा आपण स्वत: उच्च न्यायालयात याबाबत दावा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेने फेअरडील कन्स्ट्रक्शन कंपनी (मुंबई) यांना एक वर्षासाठी जकात वसुली करण्याचा ठेका आॅक्टोबर १९९५ मध्ये दिला होता; पण ‘फेअरडील’ने अटी व शर्तींचा भंग केल्याने महापालिकेने त्यांची पाच कोटींची बँक गॅरंटी १३ नोव्हेंबर १९९५ रोजी जप्त केली. त्यानंतर जकात अभिकर्ता म्हणून केलेली नेमणूक रद्द केली. या दाव्यात उच्च न्यायालयाने लवाद म्हणून डिसेंबर २००६ मध्ये नेमलेल्या डॉ. नितीन करीर यांनी २ कोटी ८७ लाख ७३ हजार रुपये व पुढील व्याज महापालिकेने द्यावे, असा निर्णय दिला; पण या निर्णयाविरुद्ध ‘फेअरडील’ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने निवृत्त न्यायाधीश एस. एन. वरिअव्वा यांचे नोव्हेंबर २००६ पासून लवाद नियुक्त केले. या कामी आजपर्यंत महापालिकेने वकिलांना व महापालिका अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे प्रचंड प्रमाणात वकील फी दिली. त्यातील रक्कम अ‍ॅड. पटवर्धन यांना वकील फी रुपये ६ लाख, अ‍ॅड. वरेकर यांना २ लाख ६८ हजार रुपये, अ‍ॅड. बेरी आणि कंपनी यांना ४७ लाख १३ हजार रुपये, लवाद न्यायाधीश एस. एन. वरिअव्वा यांची फी १५ लाख ७२ हजार ५०० रुपये अशी एकूण वकील फी व लवाद न्यायाधीश खर्च मिळून ७८ लाख ५० हजार १०० रुपये इतका खर्च झालेला आहे. लवाद फी प्रतिदिन ८० हजार रुपये लवाद म्हणून नियुक्त झालेले एस. एन. वरिअव्वा यांची एक दिवसाची फी ८० हजार रुपये असून, प्रतिदिनी हॉलभाडे ४५०० रुपये आहे. महापालिकेचे वकील अ‍ॅड. बेरी आणि कंपनी यांची एक तासाची फी ६००० रुपये व सुनावणीवेळी फी १४ हजार रुपये इतकी आहे. जकात ठेका २५ कोटींचा, दावा ४६९ कोटींचा ! फेअरडील कंपनीने वार्षिक जकात वसुलीचा ठेका २५ कोटींचा घेतला होता; पण तो रद्द केल्यानंतर वादग्रस्त ठरल्याने या कंपनीने महापालिकेवर नुकसानीचा दावा सुमारे ४६९ कोटींचा केला आहे. प्रत्येक तारखेला लाखाचा भुर्दंड महापालिकेचे इस्टेट अधिकारी राम काटकर हे या लवादाच्या कामासाठी मुंबईत जातात; पण उच्च न्यायालयात सुनावणीवेळी ते हजर राहत नाहीत. त्यांच्या प्रत्येक तारखेचा सुमारे एक लाख रुपये हा नाहक खर्च महापालिकेवर पडत आहे; पण काटकर यांच्या नावे मात्र वाहनभत्ता (टीए), दैनंदिन भत्ता (डीए) नित्यनियमाने जमा होतो. सन १९९५ मध्ये कंपनीने शर्ती व अटींचा भंग केल्याबद्दल जकात हमी रक्कम जप्त केल्यानंतर फेअरडील कंपनीला १ कोटी ७८ लाख रुपये देणे लागणारी रक्कम त्यावेळेचे गव्हर्न्मेंट इंटर्नल आॅडिटर व प्रभारी उपायुक्त जे. पी. नाईक यांनी कंपनीला दिली असती तर हे प्रकरण निकालात निघत होते; पण या अधिकाऱ्यांनी आपल्या आर्थिक लाभांची मागणी पूर्ण झाली नसल्याने ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे महापालिकेला दाव्यात प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले, असाही आरोप शेटे यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)