शरावती, चालुक्य एक्स्प्रेसमधून लाखाचा ऐवज लंपास

By Admin | Updated: February 27, 2016 00:41 IST2016-02-27T00:41:36+5:302016-02-27T00:41:36+5:30

मिरज रेल्वे पोलिसांत फिर्याद

Lava of Lakhas from Shravati, Chalukya Express | शरावती, चालुक्य एक्स्प्रेसमधून लाखाचा ऐवज लंपास

शरावती, चालुक्य एक्स्प्रेसमधून लाखाचा ऐवज लंपास

मिरज : दादर-म्हैसूर शरावती एक्स्प्रेस व यशवंतपूर-दादर चालुक्य एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी दोन प्रवासांच्या बॅगा चोरून एक लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे.
दादर ते म्हैसूर शरावती एक्स्प्रेसमधून शीतल शशिकांत गायकवाड (वय ३६, रा. म्हाडा कॉलनी, कर्जत, जि. रायगड) ही महिला एस ३ या आरक्षित बोगीतून प्रवास करीत होती. त्यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली. पर्समध्ये अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र, चार हजार रोख रक्कम, मोबाईल असा ७० हजारांचा ऐवज होता.
दुसऱ्या घटनेत बंगलोर येथे सेल्समनचे काम करणाऱ्या आबिद बर्मुद्दीन हुसेन (३२, रा. बंगलोर) या प्रवाशाची यशवंतपूर ते दादर जाणाऱ्या चालुक्य एक्स्प्रेसच्या आरक्षित बोगीतून बॅग चोरण्यात आली. बॅगेत २५ हजाराचा मोबाईल, रोख रक्कम, कपडे असा ३१ हजारांचा ऐवज होता.
याबाबत मिरज रेल्वे पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मिरज स्थानकात चोरट्यांनी महिलेचे दीड लाखाचे सोन्याचे घंठण लंपास केले. रेल्वेत चोरट्यांच्या उपद्रवामुळे प्रवासी त्रस्त आहेत. पुणे ते मिरज दरम्यान प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय असून त्यांच्या प्रतिबंधासाठी रेल्वे पोलिसांची धावपळ सुरू आहे.

Web Title: Lava of Lakhas from Shravati, Chalukya Express