महामहिला बचत निधी बँकेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:44+5:302021-02-05T06:59:44+5:30
मुदाळ तिट्टा (ता. भुदरगड) येथे महामहिला बचत गट निधी लिमिटेडचा (बँक) शुभारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामहिला बचत ...

महामहिला बचत निधी बँकेचा शुभारंभ
मुदाळ तिट्टा (ता. भुदरगड) येथे महामहिला बचत गट निधी लिमिटेडचा (बँक) शुभारंभ झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामहिला बचत गट निधी लिमिटेड या बँकेच्या अध्यक्षा डॉ. निवेदिता युवराज येडुरे होत्या. सल्लागार युवराज येडुरे म्हणाले की, या निधी बँकेला कोअर बँकिंगमध्ये एमसीएकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या कार्य तरतुदीनुसार बँकेची वाटचाल सुरू राहणार आहे. पुढील काळात सर्व संचालक मंडळाने संयमाने काम करून पुढील काही महिन्यांत या बँकेचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकविण्याचे काम करूया.
बँकेच्या उपाध्यक्षा गिरिजा गुट्टे म्हणाल्या, महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील महिलांना या बँकेच्या माध्यमातून आर्थिक बचतीचे आपलेसे वाटणारे व्यासपीठ निर्माण झाले आहे. या संधीचा फायदा सर्वांनी घ्यावा. पद्माकर पडवळ, प्रकाश पाटील, महादेव थवी, मंजिरी पडवळ, विलास पाटील, पांडुरंग सावंत, तुकाराम भाकरे, उपस्थित होते.
बँकेच्या चेअरमन डॉ. निवेदिता येडुरे, व्हाइस चेअरमन गिरिजा गुट्टे, सचिव जनाबाई रेंगे, संचालक अश्विनी थवी, वैष्णवी पडवळ, ऐश्वर्या पडवळ, गायत्री पाटील, शीतल थवी यांचा सत्कार बँकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आला.