‘लोकमत महामॅरेथॉन-कोल्हापूर सीझन २’ पर्व नोदणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 02:20 PM2018-12-06T14:20:21+5:302018-12-06T14:43:07+5:30

‘लोकमत महामॅरेथॉन सीझन १ ला मिळालेल्या दणदणीत प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा अख्खा महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे.

Launch of 'Lokmat Mahamarethon-Kolhapur Season 2' festival | ‘लोकमत महामॅरेथॉन-कोल्हापूर सीझन २’ पर्व नोदणी सुरू

‘लोकमत महामॅरेथॉन-कोल्हापूर सीझन २’ पर्व नोदणी सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत महामॅरेथॉन-कोल्हापूर सीझन २’ पर्व नोदणी सुरूबक्षिसांची लयलुट , सहा जानेवारीला सर्व कोल्हापूरकर धावणार नोंदणीला धुमधडाक्यात प्रारंभ

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन १ ला मिळालेल्या दणदणीत प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा अख्खा महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे. व्हींटोजीनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन-कोल्हापूर सीझन २ पर्वाच्या नोंदणीस प्रारंभ झाला आहे. ही मॅरेथॉन सहा जानेवारी २०१९ ला सकाळी सहा वाजता पोलीस मुख्यालय येथे आयोजित केली आहे. नोंदणीस धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे.

‘रन फॉर मायसेल्फ ’ अशी साद देत अख्ख कोल्हापूर १८ फेबु्रवारी २०१८ ला पोलीस मुख्यालय मैदान येथून धावले. अभूतपुर्व प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत महामॅरेथॉन’ च्या दुसऱ्या पर्वास सुरूवात झाली अहे.

या महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या हाफ मॅरेथॉन व सर्वाधिक सहा लाखांहून अधिक बक्षिसांच्या स्पर्धेतील सहभागाबाबत नागरीक व खेळाडूंना पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे.

दुसºया पर्वातील महामॅरेथॉन ला नाशिक येथून सुरूवात झाली आहे. यात नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर १६ डिसेंबर २०१८ ला औरंगाबाद येथे महामॅरेथॉन होत आहे. तर ६ जानेवारी २०१९ ला कोल्हापूरात तिसरी महामॅरेथॉन होत आहे. त्यानंतर नागपूर येथे ३ फेबु्रवारी २०१९ व १७ फेबु्रवारी २०१९ ला पुणे येथे महामॅरेथॉन होत आहे.

कोल्हापूरात होणारी ही महामॅरेथॉन २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन व डिफेन्स रन, तर १० कि.मी. पॉवर रन, ५ किलोमीटर फन , तर ३ किलोमीटर फॅमिली रन होणार आहे. त्यातील विजेत्यांना पदक आणि सहा लाख रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षिस देवून गौरविण्यात येणार आहे.

‘लोकमत’ ने कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरीक, क्रीडाप्रेमींसाठी ‘महामॅरेथॉन’च्या माध्यमातून एक चांगली संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आहे.

आतापर्यंत कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, नामवंत डॉक्टर्स, व्यावसायिक, वकील, अभियंते, व्यावसायिक धावपटू, प्रौढ धावपटूंनी नोंदणी केली आहे. त्यामुळे तुम्ही मागे राहू नका त्वरा करा. नोंदणी सुरू झाली आहे.

विजेत्यांना मिळणार एकूण सहा लाखांची बक्षिसे आणि बरेच काही

शर्यत               वयोगट     वर्गवारी                       प्रथम            द्वितीय           तृतीय

२१ कि.मी - १८ ते ४५       पुरुष (खुला) भारतीय     २५,०००     २०,०००       १५,००० रु
                   १८ ते ४०     महिला(खुला) भारतीय     २५,०००     २०,०००      १५,००० रु
                    ४५ वर्षांवरील पुरुष (प्रौढ) भारतीय      २५,०००     २०,०००     १५,००० रु
                    ४० वर्षांवरील महिला (प्रौढ) भारतीय   २५,०००     २०,०००     १५,००० रु
                   १८ ते ४५ वर्षांवरील पुरुष (परदेशी खेळाडू)२०,०००  १५,०००
                १८ ते ४० वर्षांवरील महिला (परदेशी खेळाडू) २०,००० १५,०००

१०.कि.मी. १८ ते ४५ वयोगट पुरुष (खुला) भारतीय    १५,०००   १२,०००      १०,०००
                  १८ ते ४० वयोगट महिला (खुला) भारतीय १५,०००   १२,०००     १०,०००
                  ४५ वर्षांवरील पुरुष (प्रौढ गट) भारतीय      १५,०००    १२,०००     १०,०००
                   ४० वर्षांवरील महिला (प्रौढगट)भारतीय    १५,०००    १२,०००   १०,०००
                  १८ ते ४५ वर्षांवरील पुरुष (परदेशी खेळाडू ) १५,०००   १०,०००
                १८ ते ४० वर्षांवरील महिला (परदेशी खेळाडू) १५,०००   १०,०००

डिफेन्स कप रन फॉर द कप पुरुष ( लष्करी दल, पोलीस) २५,०००  २०,०००   १५,०००
रन फॉर द कप महिला (लष्करी दल, पोलीस)                   २५,०००  २०,०००   १५,०००

कोल्हापूरचा नकाशाचे ‘मेडल’

या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली मेडल्स देण्यात येणार आहेत. नाशिक येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत.

धावपटूने नाशिक,औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर व पुणेमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा तयार होणार आहे. या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून ही मेडल्स पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे.

अल्प शुल्कात बक्षिसांची लयलुट

प्रकार            शुल्क           (अरली बर्ड)            मिळणारे साहित्य

३ कि.मी.       ३०० रू.         २५० रू.               गुडीबँग, मेडल, ब्रेकफास्ट
५ कि.मी.       ६०० रू .         ४९० रू.   टी-शर्ट, गुडीबँग, मेडल, ब्रेकफास्ट
१० कि.मी. १२०० रू११०० रू टी-शर्ट,गुडीबॅग, सर्टीफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
२१ कि.मी १२०० रू ११०० रू टी-शर्ट, गुडीबॅग,सर्टीफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
२१ कि.मी. १,००० रू.१००० रू टी-शर्ट,गुडीबॅग, सर्टीफिकेट, मेडल, टाईम चिप,ब्रेकफास्ट

महामॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी येथे नोंदणी करा

महामॅरेथॉन च्या दुसऱ्या पर्वाच्या नावनोंदणीला धुमधडाक्यात प्रारंभ झाला आहे. कोल्हापूरकरांसह इतर जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी www.mahamarathon.com या वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी,कोल्हापूर मोबाईल नंबर (रोहन भोसले ) - ९६०४६४४४९४, ७९७२३९२०२५ वर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीचा शेवट २० डिसेंबर २०८ ला होणार आहे. त्यामुळे त्वरा करा.
 

 

Web Title: Launch of 'Lokmat Mahamarethon-Kolhapur Season 2' festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.