कागल शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:07+5:302021-08-18T04:31:07+5:30
कागल नगरपालिकेने जाहीर केल्याप्रमाणे शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला. मंगळवारी बसस्थानकाजवळील फुटपाथावर दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे काढण्यात ...

कागल शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेस प्रारंभ
कागल नगरपालिकेने जाहीर केल्याप्रमाणे शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला. मंगळवारी बसस्थानकाजवळील फुटपाथावर दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे काढण्यात आली. या ठिकाणी फुटपाथावर खोकी ठेवण्यापासून काहींनी थेट बांधकामही केले होते.
व्यापारीवर्गाने फुटपाथवर केलेली अतिक्रमणे, अडथळे काढून घ्यावीत, अशा सूचना पालिका प्रशासन व पोलीस ठाण्याच्या वतीने चार दिवसांपूर्वी दिल्या होत्या. बसस्थानकाजवळ महामार्गाच्या बाजूला असलेली खोकीही दोन दिवसांपूर्वी मागे घेण्यास भाग पाडले आहे. कारवाईनंतर काही दुकानदारांनी रमेश माळी व इतर नगरसेवकांना भेटून अतिक्रमणे काढण्याच्या कार्यवाहीत भेदभाव करू नये, अशी मागणी केली. नगरपालिका आरोग्य आणि कर विभागाचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
१७ कागल अतिक्रमणे
फोटो.
कागल नगरपालिकेच्या एका पथकाने मंगळवारी बसस्थानकाजवळील रस्त्यावरील फुटपाथवर केलेली अतिक्रमणे काढून टाकली.