उंदरवाडीत जिल्हा बँकेच्या मायक्रो एटीएम सुविधेचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST2021-07-30T04:27:04+5:302021-07-30T04:27:04+5:30
यावेळी बोलताना मसू पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम जिल्हा बँकेने केले असून, ग्रामीण भागातील वाड्या - ...

उंदरवाडीत जिल्हा बँकेच्या मायक्रो एटीएम सुविधेचा प्रारंभ
यावेळी बोलताना मसू पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम जिल्हा बँकेने केले असून, ग्रामीण भागातील वाड्या - वस्त्यांपर्यंत बँकेने ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मायक्रो एटीएम सुविधा उंदरवाडी गावात उपलब्ध झाल्याने ग्राहकांचा वेळ वाचणार असून, ग्रामस्थांनी या सुविधेचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा.
यावेळी निरीक्षक भागवत वारके यांनी मायक्रो एटीएम, तसेच बँकेच्या इतर योजनांची माहिती दिली. यावेळी जयशिवराय संस्थेचे संचालक व सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक आर. एस. पाटील यांनी केले, तर आभार सचिव आनंदा कुदळे यांनी मानले.
फोटो ओळी : उंदरवाडी (ता. कागल) येथे जिल्हा बँकेच्या मायक्रो एटीएम सुविधेचा प्रारंभ करताना हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक मसू पाटील, निरीक्षक भागवत वारके, एस. के. पाटील व इतर.