हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना कार्यस्थळावर अथर्व-दौलतच्या मोबाईल अॅपचा प्रारंभ 'अथर्व'चे अध्यक्ष मानसिंगराव खोराटे यांच्याहस्ते झाला.
या अॅपमुळे गळीत हंगामात ऊसतोडणी कार्यक्रमात सुसूत्रता येणार आहे. ऊस उत्पादक व वाहन मालक यांना टनेजची माहिती मोबाईल मॅसेजद्वारे त्वरित मिळविण्यासाठी व नोंदणी अचूक वेळेत करणे शक्य होणार आहे.
अध्यक्ष मानसिंग खोराटे म्हणाले, आजअखेर ३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेर ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली आहेत. १५ जानेवारीपर्यंतची ऊस बिले या आठवड्याअखेर जमा करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या अथर्व दौलत कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू आहे.
मागील वर्षीप्रमाणे वेळेत ऊस बिले अदा केली आहेत. आजअखेर झालेल्या ३ लाख गाळपांपैकी २ लाख ५० हजार मे. टन ऊस चंदगड तालुक्यातील आहे.
यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, वाहन मालक उपस्थित होते.