पोलीस मुख्यालयावर अभिनव मोर्चा काढणार
By Admin | Updated: April 3, 2015 00:38 IST2015-04-03T00:02:10+5:302015-04-03T00:38:31+5:30
पानसरे हल्ला : तपास दिरंगाईचा ‘भाकप’तर्फे निषेध

पोलीस मुख्यालयावर अभिनव मोर्चा काढणार
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा पोलिसांना काहीच सुगावा लागत नसल्याचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात येणार आहे. दोन दिवसांत नियोजन करणार आहे.
पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे मारेकरी कोण यासंबंधीची कोणतीच माहिती पोलिसांकडे नाही. पोलीस वेळ मारून नेत आहेत. पानसरे यांच्या कुटुंबीयांनी व डाव्या चळवळीतील नेत्यांनी हा हल्ला उजव्या सनातनी प्रवृत्तींनीच केला असल्याचा थेट आरोप केला आहे. परंतु, पोलीस त्यासंबंधीचे पुरावे मागत आहेत. हल्ल्याप्रकरणी पोलीस सोयीस्कर व दुटप्पीपणाची भूमिका घेत असल्याची भावना झाली आहे. तपास तातडीने करण्यासाठी बिंदू चौकातून पोलीस मुख्यालयापर्यंत अभिनव पद्धतीने मोर्चा काढणार आहे. गुरुवारी पक्षातर्फे दिवंगत नेते के. आर. अकोळकर यांचा स्मृतिदिन केला. मोर्चाचे प्राथमिक नियोजन झाले. पोलीस यंत्रणेला जाब विचारला नाही, तर तपास असाच रेंगाळत राहील, अशी भीती व्यक्त करण्यात आली.