टोलविरोधात उत्तरेश्वर पेठेचा मोचा
By Admin | Updated: November 8, 2014 00:23 IST2014-11-08T00:19:03+5:302014-11-08T00:23:31+5:30
पर्यायी रस्त्यालाही विरोध : निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणारर्

टोलविरोधात उत्तरेश्वर पेठेचा मोचा
कोल्हापूर : अन्यायी टोलविरोधात उत्तरेश्वर पेठ परिसरातील नागरिकांनी आज, शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी व महापौर तृप्ती माळवी यांना निवेदन दिले. पर्यायी रस्त्याला विरोध असल्याचे यावेळी प्रशासनाने सांगितले.काही दिवस टोलच्या रस्त्याला पर्यायी रस्ते उभे करणे हा विषय स्वाभिमानी कोल्हापूरकरांना मान्य नाही. त्यामुळे टोलविरोधी आंदोलनाला बळ देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय उत्तरेश्वर पेठेतील वाघाची तालमीने घेतला. आज सकाळी उत्तरेश्वर पेठ महादेव मंदिर चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी हा मोर्चा महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला. यावेळी घोषणाबाजी झाली. टोलप्रश्नी महापालिकेने योग्य निर्णय न घेतल्यास पुढील काळात रास्ता रोको, बोंब मारो व मुंडण आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.मोर्चामध्ये दीपक काटकर, आण्णा पसारे, योगेश येळावकर, मंगेश येळावकर, उदय प्रभावळे, युवराज तोडकर, अविनाश तोडकर, रमेश साळोखे, फिरोज किंगमेकर, सागर साळोखे, महेश नलवडे, जय मेवेकरी, राहुल चव्हाण, शिवाजी पाटील, विराज चिखलीकर, आदींचा सहभाग होता.