शरद पवार यांच्याकडून नाराजीला उशीरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST2021-06-30T04:16:58+5:302021-06-30T04:16:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करायला खूप उशीर केला, आता तर ...

Late displeasure from Sharad Pawar | शरद पवार यांच्याकडून नाराजीला उशीरच

शरद पवार यांच्याकडून नाराजीला उशीरच

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करायला खूप उशीर केला, आता तर राज्याचे आर्थिक आणि वैद्यकीय वाटोळे झाले आहे, खूप नुकसानही होऊन गेले आहे. आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी खूप मोठी भूमिका बजावायला हवी होती, त्यांचा अंकुश असायला हवा होता, पण सत्तास्थापन होऊन दीड वर्ष झाले तरी त्यांनी केले नाही, आता २८ नोव्हेंबरला दोन वर्षे होतील, पण तोपर्यंत सरकार टिकले तर अशी खोचक टिप्पणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली.

आमदार पाटील म्हणाले, रोज एवढ्या बैठका होत आहेत, संजय राऊत इकडून तिकडे धावत आहेत, बैठका घ्यायच्याच असतील तर एकत्र घ्या, त्या राऊतांना एवढे धावायला कशाला लावता.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फसवणूक होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी १९९४ व २०१४ चा अपवाद वगळता केंद्रात व राज्यात तुमचीच सत्ता होती, इतकी वर्षे सत्ता असतानाही आरक्षण देऊ शकला नाही, याउलट फडणवीस यांनी ते दिले, न्यायालयात ते टिकवून दाखवले. उलट दोन्ही कॉंग्रेसनेच जनतेला फसवले.

चौकट

एवढ्या संस्था कशा?

केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर अनेक नेत्यांनी आपले आणि समाजाचे कल्याण केले, पण मराठा समाजातील नेत्यांनी ते केले नाही, इतरांपेक्षा स्वत:चे कल्याण जास्त बघितले. नाही तर बंद पडणाऱ्या स्कूटरवरून फिरणाऱ्यांकडे एवढ्या संस्थाचा पसारा कुठून आला असता, अशी टीका आमदार पाटील यांनी केली.

चाैकट

मुश्रीफ यांचे कौतुक

मी काहीही बोललो तरी मुश्रीफ त्याला प्रत्युत्तर देतात हे बघून ते मला महत्त्व देतात याचे कौतुक वाटते, असा पलटवार आमदार पाटील यांनी केला.

Web Title: Late displeasure from Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.