शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Lata Mangeshkar: अन् 'त्या' घटनेनंतर लतादीदी कोल्हापूरपासून दुरावल्या, नेमकं असं काय झालं जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 13:07 IST

जयप्रभा स्टुडिओवरुन झालेला वाद मात्र चांगलाच गाजला

कोल्हापूर : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. आपल्या सूरमधुर आवाजाने जगभरातील श्रोत्यांवर मोहिनी घालणाऱ्या लतादीदींनी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. 

गेली ६-७ दशकांपासून लतादीदींनी सुरमयी आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं होते. कोल्हापूरशी लतादीदीचे खास नातं होतं. पन्हाळ गडावर असलेल्या घरात राहण्यासाठी लतादीदी वर्षातून दोनदा कोल्हापूरला यायच्या. जयप्रभा स्टुडिओवरुन झालेला वाद मात्र चांगलाच गाजला. स्टुडिओच्या जागेच्या विक्रीच्या हालचाली झाल्या तेव्हा कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्या विरोधात भूमिका घेत निषेध केला. जयप्रभा स्टुडिओ आणि वादलता मंगेशकर आणि भालजींसह त्यांच्या कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध होते. त्या भालजींचा शब्द अखेरचा मानायच्या. मुंबईला गेलेल्या लतादीदी भालजींमुळे पुन्हा कोल्हापूरशी जोडल्या गेल्या. भालजींवर बँकेचे कर्ज असल्याने जयप्रभा स्टुडिओ लिलावात काढण्याची वेळ आली. लतादीदींनी हा स्टुडिओ विकत घेतला. स्टुडिओचा व्यवहार होताना मात्र भालजींनी लतादीदींना या परिसराचा वापर केवळ चित्रपट व्यवसायासाठीच केला जावा अशी अट घातली होती. भालजी असेपर्यंत लतादीदींनी शब्द पाळला. पुढे काही वर्षांनी स्टुडिओ वगळता मोकळी जागा विकासकाला विकण्यात आली.पण लता मंगेशकर यांनी सुरुवातीच्या टप्प्यात स्टुडिओच्या विकासासाठी तयारी दर्शवली होती. अखेर २०१२ साली स्टुडिओच्या जागेच्या विक्रीच्या हालचाली झाल्या तेव्हा कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्या विरोधात भूमिका घेत निषेध केला. या घटनेनंतर त्या कोल्हापूरपासून दुरावल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLata Mangeshkarलता मंगेशकर