अकरावी प्रवेशाचा अखेरचा दिवस

By Admin | Updated: July 4, 2015 00:02 IST2015-07-03T23:44:33+5:302015-07-04T00:02:39+5:30

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रत्यक्ष प्रवेश सुरू : पॉलिटेक्निकच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला मुदतवाढ

The last day of the eleventh entrance | अकरावी प्रवेशाचा अखेरचा दिवस

अकरावी प्रवेशाचा अखेरचा दिवस

कोल्हापूर : अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. अर्ज भरलेल्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दिवसभरात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी आपला प्रवेश निश्चित केला. आज, शनिवारी अकरावीसाठी प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचा अखेरचा दिवस आहे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने गेल्या चार दिवसांपूर्वी निवड यादी प्रसिद्ध केली. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. तक्रारी नोंदविण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस होता. शहरातील कॉमर्स कॉलेज (वाणिज्य) आणि गोखले कॉलेज (विज्ञान) या तक्रार निवारण केंद्रांवर गेल्या तीन दिवसांत ३०८ तक्रार अर्ज दाखल झाले. त्यापैकी ४१ मान्य, २६२ अमान्य आणि ५ तक्रारी प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचा शनिवारी अंतिम दिवस आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर सोमवारी (दि. ६) दहावीतील ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले. ‘आयटीआय’मधील विविध अभ्यासक्रमांच्या १ हजार ३६६ जागांसाठी ३ हजार १८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. अभ्यासक्रमांसाठी विकल्प भरण्याची शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत अंतिम मुदत होती. शनिवारी सकाळी निवड यादी आॅनलाईन प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. निवड यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर, मूळ कागदपत्रांसाठी उपस्थित रहाणे आवश्यक असल्याचे ‘आयटीआय’चे प्राचार्य दिनेश माने यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या फेरीतील प्रवेश निश्चितीची रविवारी (दि. ५) अंतिम मुदत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन आणि खासगी पॉलिटेक्निकमधील प्रवेश अर्जांची विक्री आणि स्वीकृतीला रविवारपर्यंत (दि. ५) मुदतवाढ मिळाली आहे. अर्ज विक्री, स्वीकृतीसह हरकती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाजी विद्यापीठातील विविध २२ पदव्युतर अभ्यासक्रमांच्या निवड यादीची शुक्रवारी आॅनलाईन प्रसिद्धी झाली. याबाबत हरकती नोंदविण्याची प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम निवड यादीची प्रसिद्धी होणार आहे. (प्रतिनिधी)


शाहू कॉलेजमध्ये बी.लिब. प्रवेश सुरू
कदमवाडी येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये मुक्त विद्यापीठाचे
बी. लिब आणि आय.एससीचे शिक्षणक्रम सुरू केले आहेत. त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती ग्रंथपाल एस. बी. कोरडे यांनी दिली.

Web Title: The last day of the eleventh entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.