शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठे स्ट्रक्चर, आवाजाची ट्रायल चालणार नाही; पोलिसांचा सज्जड इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:14 IST

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी आवाजाचा दणदणाट केल्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी रविवारी (दि. ३१) शहरातील ध्वनियंत्रणा, लाईट्स, जनरेटर, ...

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी आवाजाचा दणदणाट केल्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी रविवारी (दि. ३१) शहरातील ध्वनियंत्रणा, लाईट्स, जनरेटर, स्क्रीन व्यावसायिक आणि गणेश मंडळांची बैठक घेतली. पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये झालेल्या बैठकीत लाईट्सचे मोठे स्ट्रक्चर आणि मिरवणुकीच्या आधीच होणारी ध्वनियंत्रणांची ट्रायल चालणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला. तसेच आवाज मर्यादा आणि वेळेचे पालन न करणाऱ्या मंडळांच्या ध्वनियंत्रणा जप्त करून गुन्हे दाखल करणार असल्याचे अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी स्पष्ट केले.राजारामपुरीसह शहरात ठिकठिकाणी झालेल्या गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केले. विसर्जन मिरवणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांनी तातडीने रविवारी शहरातील सर्व मंडळांसह मंडप व्यावसायिक, ध्वनियंत्रणा, लेसर, लाईट्स, स्क्रीन आणि जनरेटर व्यावसायिकांची बैठक घेतली. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांनी आगमन मिरवणुकीतील अतिउत्साह दाखवलेल्या मंडळांवर गुन्हे दाखल केल्याचे सांगितले.सूचनांचे उल्लंघन केल्यास पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेणार नाहीत. संबंधित मंडळातील पदाधिऱ्यांसह साऊंड सिस्टीमस्, लाईट्स, जनरेटरचे मालक, चालकांवरही गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच लाईट्स स्ट्रक्चरची उंची १२ फूट आणि रुंदी १० फूट एवढीच असेल, अशी सूचना केली.शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनीही मंडळांना कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत सूचना दिल्या. नियमांचे पालन न केल्यास यापुढे मिरवणुकीत ध्वनियंत्रणांना परवानगीच मिळणार नाही. उत्सवाला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन रावडे यांनी केले. तसेच उपअधीक्षक पाटील यांनी मंडळांना जास्तीत जास्त शिक्षा होईल, अशा कलमांखाली गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, संजीव झाडे, संतोष डोके, सुशांत चव्हाण यांच्यासह दोनशेहून अधिक मंडळांचे पदाधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते.या आहेत महत्त्वाच्या सूचना

  • मिरवणुकीत लेसर, धूर फवारणी करणारे स्मोकर वापरू नका
  • कर्कश ध्वनी निर्माण करणारे प्रेशर मीड आणि आग ओकणाऱ्या यंत्रणांना परवानगी नाही.
  • स्ट्रक्चर १२ बाय १० चे असेल
  • मिरवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन, पासिंग आवश्यक
  • लेसर, उच्च ध्वनियंत्रणांना बंदीच
  • ध्वनियंत्रणांची ट्रायल घेताच जप्तीची कारवाई
  • मिरवणुकीत इतर मंडळांची अडवणूक चालणार नाही
  • जनरेटरची तपासणी आवश्यक

मंडळे, व्यावसायिकांना नोटिसापोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस पोलिसांनी शहरातील सर्व मंडळे आणि व्यावसायिकांना दिली. मिरवणुकीत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही पोलिसांनी मंडळे आणि व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.