स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST2021-08-01T04:23:39+5:302021-08-01T04:23:39+5:30

इचलकरंजी : पंचगंगा नदीच्या महापुरामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भागांमध्ये रोगराई पसरू नये म्हणून ...

A large number of people should participate in the cleaning campaign | स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

इचलकरंजी : पंचगंगा नदीच्या महापुरामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भागांमध्ये रोगराई पसरू नये म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने रविवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक रमेश लाहोटी यांनी केले आहे. पालिका प्रशासनाच्यावतीने स्वच्छता केली जात असली तरी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही मोहीम हाती घेतली आहे. रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी सुभाष छाबडा व मधुसूदन मालपाणी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन लाहोटी यांनी केले आहे.

Web Title: A large number of people should participate in the cleaning campaign