कडवी खोऱ्याला भूस्खलनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST2021-07-28T04:23:54+5:302021-07-28T04:23:54+5:30
हुंबवली गावच्या हद्दीवरील अरविंद कल्याणकर यांच्या मळ्यातील सव्वाशे फुटाचा कडा तुटून दोन वर्षांच्या बांबू लागवडीचे नुकसान झाले. धाऊडवाडा व ...

कडवी खोऱ्याला भूस्खलनाचा फटका
हुंबवली गावच्या हद्दीवरील अरविंद कल्याणकर यांच्या मळ्यातील सव्वाशे फुटाचा कडा तुटून दोन वर्षांच्या बांबू लागवडीचे नुकसान झाले. धाऊडवाडा व धोपेश्वर धनगरवाडा येथील जंगल भागात भूस्खलन झाले. घोळसवडे येथील मोहिते मळ्यातील तीनशे फूट मातीची धड कोसळल्याने शंकर पाटील यांची दोन एकर भातशेती मातीखाली गेली, तर मोहिते यांची विहीर मुजली आहे. लव्हाळा-उदगिरीदरम्यान वाकोलीची टेकडी खचून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. सुमारे साठ फूट रस्त्यांची हानी झाली आहे.
वारूळ येथील दर्यातील डोंगर खचून गावाच्या शिवारात पसरल्याने पाच शेतकऱ्यांची शेती मातीत बुडाली आहे. जावली येथील सीताराम पाटील व सुरेश तळेकर यांच्या भाताच्या ताली ढासळून नदीला मिळाल्या आहेत. चांदोली धनगरवाड्यावरील टेकडीचा भाग कोसळून जंगलच्या वाटेवर विखुरला आहे.
फोटो ओळी-1
लव्हाळा उदगिरी देवस्थान रस्तादरम्यान वाकोलीची टेकडीचे भूस्खलन होऊन नव्याने बांधलेला रस्ता तुटला आहे.