भूसंपादनाचा तिढा सुटता सुटेना

By Admin | Updated: November 20, 2015 00:56 IST2015-11-20T00:54:27+5:302015-11-20T00:56:37+5:30

शासकीय अधिकाऱ्यांची अनास्था : जमिनीला दोन वेगवेगळे दर दिल्याने वादास तोंड

Landed acquisition | भूसंपादनाचा तिढा सुटता सुटेना

भूसंपादनाचा तिढा सुटता सुटेना

सतीश पाटील--शिरोली-कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरूहोऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत; मात्र आजही भूसंपादनाचा तिढा कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशाही झालेला नाही. शासकीय पातळीवर लटकलेला हा प्रश्नही या रस्त्याच्या विलंबाचे मुख्य कारण आहे.
चौपदरीकरण वेगाने होण्यासाठी सुप्रीम कंपनीला भूसंपादन तातडीने करून देणे गरजेचे होते. मात्र, मार्गाशेजारील शिरोली, हालोंडी, हेर्ले, रूकडी फाटा, अतिग्रे, हातकणंगले, तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, अंकली, दूधगाव, जयसिंगपूर, सांगली, आदी पंधरा गावांतील शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी रस्त्यासाठी संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला. बाजारभावाप्रमाणे दर देण्याची मागणी असताना शासकीय दराप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिल्याने विरोधाचा जोर वाढला. त्यातच शासनाने शिरोली, हालोंडी या गावांतील जमिनींचा जो दर काढला, तो पुढील गावच्या शेतकऱ्यांना दिला नाही. त्यामुळे पुन्हा वाद सुरू झाला. यासाठी प्रांताधिकारी अश्विनी जिरगे, शेतकरी आणि सुप्रीम कंपनी यांच्या बैठका झाल्या; पण त्यात लवकर तोडगा निघाला नाही. त्यामुळे भूसंपादनाचा तिढा आणखी घट्ट होत गेला. त्यामुळे काम रखडले व वाहनधारकांतून संताप व्यक्त होऊ लागला. भूसंपादनाबाबतीतील अडचणी दूर करून भूसंपादन तातडीने करून द्या, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मे महिन्यात कोल्हापूरमधील सार्वजनिक शासकीय विश्रामधाम येथे सर्व संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन सांगितले होते. बैठकीत तत्काळ प्रश्न मार्गी लावतो, असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते; पण आश्वासन हवेतच विरले आहे, एक इंचही भूसंपादनाचा प्रश्न निकाली लागलेला नाही. (क्रमश:)

प्रश्न कायम : येथील भूसंपादन रखडले...
हेर्ले येथील रस्त्याशेजारील घरांचे भूसंपादन
अतिग्रे येथील रस्त्याकडेची सुमारे दोनशे घरे चौपदरीकरणात गेली आहेत. त्यांना दुसरीकडे घर बांधण्यासाठी अद्याप पर्यायी जागा दिलेली नाही.
हातकणंगले येथील शासकीय कार्यालये अजून रस्त्यावरच
तमदलगे येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घरांचा प्रश्न
कायम
निमशिरगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा रस्त्यात जाते. या शाळेचा प्रश्न प्रलंबित आहे.
जयसिंगपूर येथील मध्यवर्ती वस्तीतील बांधकामांचा अडथळा अजून आहे.
दूधगाव येथील रस्त्यालगतचे भूसंपादन अद्याप झालेले नाही
सांगली जिल्ह्यातील
जागाच अजून कंपनीला काम करण्यासाठी मिळालेली
नाही.

Web Title: Landed acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.