शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ'साठी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजणीस प्रशासन दचकून, विरोधाचा घेतला धसका

By भीमगोंड देसाई | Updated: June 21, 2025 17:21 IST

भरपाईची रक्कम जाहीर नसल्याने संभ्रम

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी लागणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील जमीन मोजणीचा श्रीगणेशाच अजून झालेला नाही. महामार्गाला बाधित शेतकरी, विविध संघटनांनी विरोध केल्याने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, भूमी अभिलेख प्रशासनाने अजून मोजणीची प्रक्रिया सुरू केलेली नाही. शेजारी सांगलीत येत्या बुधवारपासून मोजणी होणार आहे. पण कोल्हापुरात अजून यासंबंधीच्या कोणत्याही हालचाली नाहीत. भरपाईची रक्कम जाहीर करा आणि मगच आमच्या शेतात या, अशी भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतल्याने जिल्ह्यात सध्या वेट ॲन्ड वॉच अशा भूमिकेत यंत्रणा आहे, असे महामंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग ८०२ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित आहे. सांगली, कोल्हापूरसह बारा जिल्ह्यातून महामार्ग जाणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार हा महामार्ग करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे.गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना महामंडळास दिल्या आहेत. दरम्यान, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचा विरोध तीव्र असल्याने प्रशासन कात्रीत सापडले आहे. सांगलीत बुधवारपासून मोजणी करण्याचे जाहीर केले आहे.पण विरोधामुळे ही मोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल की नाही, याबद्दल महामंडळाच्या अधिकाऱ्यांतही शंका आहे. यापूर्वी विरोध झाल्याने मोजणीची प्रक्रिया झाली नसल्याने त्यांच्या मनात यावेळीही शंका निर्माण झाली आहे. शेजारच्या सांगलीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात विरोधाची तीव्रता अधिक असल्याने प्रशासन दचकून आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रस्तावित महामार्ग..

  • महामार्गाची रुंदी : सहा पदरी, ३०० फूट रुंद
  • बाधित गावे : ६०
  • बाधित जमीन : ५ हजार २०० एकर.