महिला प्रवाशाचे सव्वा लाखाचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST2021-03-07T04:22:14+5:302021-03-07T04:22:14+5:30

कोल्हापूर : पुण्याहून आलेल्या महिला प्रवाशाचे सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल असणाऱ्या दोन पर्स अज्ञाताने ...

Lampas with jewelery worth Rs | महिला प्रवाशाचे सव्वा लाखाचे दागिने लंपास

महिला प्रवाशाचे सव्वा लाखाचे दागिने लंपास

कोल्हापूर : पुण्याहून आलेल्या महिला प्रवाशाचे सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल असणाऱ्या दोन पर्स अज्ञाताने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी अर्णिका सचिन गंबरे (रा. वाल्हेकरवाडी, चिचवाड) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अर्णिका गंबरे ह्या शुक्रवारी दुपारी पुण्याहून कोल्हापुरात आल्या. त्या मध्यवर्ती बसस्थानकापासून हरिओमनगरातील त्यांचे नातेवाईक संजय कलवार यांच्या घरी गेल्या. या दरम्यान, प्रवासात त्यांच्या बगलेत अडकविलेल्या बॅगची चेन अज्ञाताने काढली, त्या बॅगमधील दोन छोट्या पर्समध्ये असलेले २८ ग्रॅम सोन्याचे मणीमंगळसूत्र व रोख एक हजार रुपये असा सुमारे एक लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. त्यांनी याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

Web Title: Lampas with jewelery worth Rs