शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या गळ्यातील ६० हजाराचे दागिने हिसडा मारुन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 19:08 IST

Crimenews Kolhapur : पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत नेत असल्याचा बहाणा करुन दोघा युवकांनी निर्जन रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र व लक्ष्मीहार असा सुमारे ६० हजाराचा ऐवज हिसडा मारुन चोरुन नेल्याची घटना घडली. येथील कृषी विद्यापीठातील मुलींचे होस्टेल ते सरनोबतवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. याप्रकरणी सुनिता जनार्दन कांबळे (वय ५० रा. नवीन होस्टेलनजीक, कृषी विद्यापीठ, सरनोबतवाडी) यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

ठळक मुद्देमहिलेच्या गळ्यातील ६० हजाराचे दागिने हिसडा मारुन लंपास दोघा दुचाकीस्वारांचे कृत्य : कृषी विद्यापीठनजीक घटना

कोल्हापूर : पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत नेत असल्याचा बहाणा करुन दोघा युवकांनी निर्जन रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र व लक्ष्मीहार असा सुमारे ६० हजाराचा ऐवज हिसडा मारुन चोरुन नेल्याची घटना घडली. येथील कृषी विद्यापीठातील मुलींचे होस्टेल ते सरनोबतवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. याप्रकरणी सुनिता जनार्दन कांबळे (वय ५० रा. नवीन होस्टेलनजीक, कृषी विद्यापीठ, सरनोबतवाडी) यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुनिता कांबळे ह्या कृषी विद्यापीठातील मुलीच्या होस्टेवर सफाई कामगार म्हणून काम करतात. सोमवारी सायंकाळी त्या होस्टेलमधील काम अटोपते घेऊन मधल्या रस्त्यावरुन सरनोबतवाडीकडे पायी घरी जात होत्या, त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून दोघे युवक लाल रंगाची दुचाकी पेट्रोल संपल्याचा बहाणा करुन ढकलत पुढे येत होते.

त्या कच्च्या मार्गावर खणीजवळ आल्यानंतर त्या दोघां युवकांनी कांबळे यांच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र व सोन्याचा लक्ष्मीहार हिसडा मारुन तोडून घेतले. कांबळे यांनी त्वरीत गळ्यावर हात ठेवल्याने अर्धा लक्ष्मीहार त्यांच्या हातात राहीला. चोरट्यांनी हाती लागलेला अर्धा सोन्याचा लक्ष्मीहार व मणी मंगळसुत्र घेऊन पलायन केले. घटनेनंतर कांबळे यांनी आरडा-ओरडा केला, पण तोपर्यत चोरट्यांनी दुचाकी सुरु करुन धूम ठोकली.घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पर्यवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक साहील झिरकार, पो.नि. सिताराम डुबल, उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पहाणी केली.दरम्यान, सुनिता कांबळे यांनी सोमवारी रात्री उशीरा राजारामपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. त्यामध्ये सुमारे २० हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळे वजनाचे मणी मंगळसुत्र व ४० हजार रुपये किंमतीचे एक तोळे सोन्याच्या लक्ष्मीहारचा अर्धा भाग अज्ञाताने चोरल्याचा गुन्हा नोंदवला आहे. 

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर