शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी
2
बहुमत असेल तर नगरसेवक दाखवू शकतील नगराध्यक्षांना घरचा रस्ता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
3
‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला
4
आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२५, नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील
5
जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा
6
सलमान खानच्या घरी येणार नवा पाहुणा? अरबाजची दुसरी पत्नी शूरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा
7
मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार
8
शिक्षक भरती घोटाळा: शिक्षण खात्याचे डिजिटल पेंढारी
9
‘मंत्री, सचिवांनी ‘असे’ न्यायनिवाडे करू नयेत’, उच्च न्यायालयाचे मंत्र्यांना आदेश
10
शिक्षक भरती घोटाळा: मुख्याध्यापकाने पाठवलेला प्रस्ताव झाडाझडतीनंतर पोलिसांच्या हाती
11
Viral Video: कारच्या डिक्कीतून बाहेर लटकला हात; रील करण्याचे कारण तपासातून आले समोर
12
पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे
13
अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप
14
विशेष लेख: भारतीय राज्यघटनेतील ‘पूर्व-पश्चिमे’चा संगम!
15
चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान
16
न्यायासाठी लढा... एका झाडासाठी शेतकऱ्याला एक कोटी रुपये भरपाई!
17
राज्यात कोणत्याही लिफ्टला नाही एक्स्पायरी डेट! धक्कादायक माहिती आली समोर
18
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र
19
"काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण..."; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य
20
सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन

जैन अल्पसंख्यक महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी; पहिल्या अध्यक्षपदाचा मान कोल्हापूरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 17:16 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे ...

कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांची निवड करण्यात आली.जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ललित गांधी यांची गेल्या अकरा वर्षांत देशभर केलेल्या कामाची दाखल घेऊन सरकारने ही निवड केली आहे. या महामंडळाचे मुख्यालय, मुंबई येथे राहणार असून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय कार्यरत राहणार आहे. राज्यातील जैन समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे व त्यांचे सामाजिक सक्षमीकरण करणे. समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याजदराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करुन देणे, त्याची वसूली करणे, जैन समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे, समाजासाठी आवश्यक साहित्य आणि सामग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यांसाठी सेवा देणे, समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे हा महामंडळाचा उद्देश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केल्याबद्दल गांधी यांनी त्यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री मंगलप्रभात लोढा, नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, ‘मित्रा’चे उपाध्यक्ष अजय आशर यांचे सहकार्य लाभले असून, समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करू, असे ललित गांधी यांनी सांगितले. गांधी यांच्या निवडीने राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्षपद मिळाल्याने जैन समाजात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर