फुटबॉल स्पर्धेत लाल आखाडा संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST2021-01-25T04:26:10+5:302021-01-25T04:26:10+5:30
सामना गोल शून्य बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शुटआउटवर सामन्याचा निकाल झाला. मुरगुड संघाकडून प्रथमेश रेंदाळे, अमर दिवटे व अमृत पोतदार ...

फुटबॉल स्पर्धेत लाल आखाडा संघ विजेता
सामना गोल शून्य बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शुटआउटवर सामन्याचा निकाल झाला. मुरगुड संघाकडून प्रथमेश रेंदाळे, अमर दिवटे व अमृत पोतदार यांनी गोल केले, तर गारगोटीकडून फक्त गणेश वास्कर यालाच गोल करता आला.
तिसरा क्रमांक सानिका स्पोर्टस संघास मिळाला. १६ संघानी सहभाग घेतला होता. वैयक्तिक बक्षीसे अशी : उत्कृष्ट गोल किपर-देवेन राऊत, उत्कृष्ट डिफेन्डर- ऋषीकेश भारमल, उत्कृष्ट मिड फिल्डर-चिन्मय केसरकर, उत्कृष्ट स्ट्रायकर-गणेश वास्कर,उत्कृष्ट खेळाडू-रोहित मोरबाळे. बक्षीस समारंभ युवा नेते सत्यजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाला अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य महादेव कानकेकर होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, मुरगूड पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल पाटील, राजू चव्हाण, पांडुरंग पुजारी, प्रा.केसरकर, विजय मोरबाळे, ओंकार पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला. पंच म्हणून संग्राम सासणे, अमृत पोतदार, सुशांत महाजन, मयूर सणगर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पांडुरंग पुजारी, सिद्धेश पोतदार,आप्पाजी गोधडे, संदीप आबिटकर, शिवाजी मोरबाळे, सुशांत महाजन यांचे सहकार्य लाभले. स्वागत व प्रास्ताविक गणेश तोडकर यांनी केले, तर आभार रोहित मोरबाळे यांनी मानले.
फोटो ओळ :-
मुरगूड येथील फुटबॅाल स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस लाल आखाडा संघास देताना सत्यजित पाटील, महादेव कानकेकर, दगडू शेणवी, अनिल पाटील व अन्य.