लाल आखाडा संघ ठरला खासदार चषकाचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:25 IST2021-02-11T04:25:56+5:302021-02-11T04:25:56+5:30
नगराध्यक्ष राजेखान जमादार, यशोवर्धन मंडलिक, मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, पांडुरंग ...

लाल आखाडा संघ ठरला खासदार चषकाचा मानकरी
नगराध्यक्ष राजेखान जमादार, यशोवर्धन मंडलिक, मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, पांडुरंग भाट, माजी पंचायत समिती सदस्य आर. डी. पाटील, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव पाटील, संतोषकुमार वंडकर, दगडू शेणवी, माजी नगरसेवक किरण गवाणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील, सुहास खराडे, संदीप कलकुटकी, अनिल राऊत, मारुती कांबळे, दीपक शिंदे, भगवान लोकरे, रविराज परीट, राजू भाट, दत्ता मंडलिक, सुनील रणवरे यांच्या हस्ते बक्षिसे वितरित केली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू कैलास पाटील, रोहन आडनाईक, योगेश कदम, ऋषिकेश मेथे-पाटील, शकील पटेल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संदीप पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. देवेंद्र राऊत यांनी स्वागत केले. अनिल पाटील यांनी समालोचन केले. प्रथमेश भाट यांनी आभार मानले.
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे, बेस्ट गोलकीपर- अनिकेत पवार (लाल आखाडा), बेस्ट डिफेंडर - अक्षय मेथे पाटील (सानिका स्पोर्ट्स), बेस्ट मिडफिल्डर - रोहन आडनाईक (लाल आखाडा), बेस्ट फॉरवर्ड - विशाल पाटील, बेस्ट टूर्नामेंट - सौरभ सालपे (दोघेही सानिका स्पोर्ट्स).
फोटो ओळ :- मुरगूड (ता. कागल) येथील राणाप्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला बक्षीस देताना यशोवर्धन मंडलिक, किशोरकुमार खाडे, आदी.