दुचाकीच्या डिकीतील ७० हजारांचा लक्ष्मीहार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:05+5:302021-03-17T04:26:05+5:30

कोल्हापूर : दुचाकीच्या डिकीतून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा सोन्याचा लक्ष्मीहार अज्ञाताने चोरला, ही घटना रविवारी सायंकाळी सासने मैदाननजीकच्या ...

Lakshmihar lamps worth Rs 70,000 in a two-wheeler | दुचाकीच्या डिकीतील ७० हजारांचा लक्ष्मीहार लंपास

दुचाकीच्या डिकीतील ७० हजारांचा लक्ष्मीहार लंपास

कोल्हापूर : दुचाकीच्या डिकीतून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा सोन्याचा लक्ष्मीहार अज्ञाताने चोरला, ही घटना रविवारी सायंकाळी सासने मैदाननजीकच्या डी मार्ट या मॉलच्या पार्किंगमध्ये घडली. याबाबत संदीप जयराम सावंत (रा. राजे संभाजी कॉलनी, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत) यांनी मंगळवारी सायंकाळी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप सावंत हे रविवारी सायंकाळी डी मार्ट या मॉलमध्ये साहित्य खरेदीसाठी गेले होते. त्यांनी मॉलच्या पार्किंगमध्ये आपली दुचाकी उभी केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीची डिकी उघडून त्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचा सोन्याचा लक्ष्मीहार लंपास केला. सावंत हे खरेदी करून आल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी या चोरीची मंगळवारी सायंकाळी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Lakshmihar lamps worth Rs 70,000 in a two-wheeler