पोलीस स्टेशनच्या दारात एसटीमध्ये दीड तोळ्याचा लक्ष्मीहार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:01+5:302021-01-14T04:21:01+5:30
अधिक माहिती अशी बोरवडे, ता. कागल येथील सावित्री कृष्णात भारमल व त्यांचे नातेवाईक मुरगूड येथील पाहुण्यांना भेटू गावी परत ...

पोलीस स्टेशनच्या दारात एसटीमध्ये दीड तोळ्याचा लक्ष्मीहार लंपास
अधिक माहिती अशी बोरवडे, ता. कागल येथील सावित्री कृष्णात भारमल व त्यांचे नातेवाईक मुरगूड येथील पाहुण्यांना भेटू गावी परत जाण्यासाठी मुरगूडच्या एसटी स्टँडवर आले. सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान मुरगूड ते कोल्हापूर अशी बस (MH- O6-S-8229) लागली होती. भारमल या प्रवाशांच्या गर्दीतून गाडीत चढत असताना त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा लक्ष्मीहार अज्ञात चोरट्याने लंपास केला. याबाबत श्रीमती भारमल यांनी गाडीत आरडाओरडा केला. त्यामुळे चोरटा गाडीतच असावा या संशयाने एसटी बस पोलीस स्टेशनच्या दारात नेली. सुमारे दीड- दोन तास तपास चालू होता. शाळेच्या अनेक विद्यार्थिनी या बसमध्ये होत्या. शाळा सुटून बराच काळ झाल्याने निढोरी-आदमापूर या गावातील पालक मुरगूडमध्ये आले. दरम्यान, घाबरून अनेक विद्यार्थी रडकुंडीला आले होते. शेवटी सर्व प्रवाशांची झाडाझडती झाल्यानंतर गाडी सोडली. दरम्यान, भारमल यांनी पोलिसास फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.