शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साडेतीन लाख घरे ‘सौभाग्य’मुळे उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 22:39 IST

कोल्हापूर : ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही,

ठळक मुद्देघर तिथे वीजजोडणी : देशाच्या तुलनेत राज्याचा वेग अधिकदोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ यशस्वी

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही, अशा कुटुंबात मोफत वीज देण्याची घोषणा पंतप्रधानांनी सोमवारी (दि. २५) केली असून, त्यानुसार महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांत या ‘सौभाग्य’ योजनेतून वीजपुरवठा करण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे. ‘महावितरण’ने मार्च २०१५ पासून तब्बल १६ लाख कुटुंबांच्या घरांत उजेड पेरण्याचे काम केले आहे.

देशात अजूनही वीज पोहोचली नाही अशी तब्बल चार कोटी कुटुंबे आहेत. त्यांना मार्च २०१९ पर्यंत वीज देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार १६ हजार ३२० कोटी रुपये खर्च करणार आहे. सन २०११ च्या सामाजिक व आणि आर्थिक जनगणनेमध्ये नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत कनेक्शन देण्याची ही ‘सौभाग्य’ योजना आहे. पंतप्रधानांनी योजना जाहीर केल्यावर महाराष्ट्रात अंधारात संसार करणारी किती कुटुंबे आहेत, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला.

मार्च २०१५ पर्यंत अशी वीज नसलेली राज्यातील ३० जिल्ह्यांत तब्बल १९ लाख ३६ हजार ६९० कुटुंबे होती. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनावर घेऊन ‘घर तिथे वीज’ देण्याचा कार्यक्रम अत्यंत कार्यक्षमतेने राबविला. त्यातून दोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ यशस्वी झाले आहे. ज्या अत्यंत दुर्गम भागात वीज नेण्यासाठी अडचणीच आहेत, तिथे महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणेच्या (महाऊर्जा) माध्यमातून अपारंपरिक ऊर्जासाधनांचा वापर करून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यत: गडचिरोली, नंदूरबार अणि चंद्रपूर जिल्ह्यांत अशी १११ गावे असून, तिथे ३० कोटी खर्चून डिसेंबर २०१७ पर्यंत वीजजोडणी देण्याचे नियोजन आहे.वीजपुरवठा नसलेल्या कुटुंबांची जिल्ह्यांतील संख्यासातारा- १०४८३ सांगली- ५१९१, सिंधुदुर्ग- ४०६५ ठाणे- २२०१३, नाशिक- २१९५८ नंदूरबार ३३६५६, जळगाव- २९३२८ पुणे- २७१३,नांदेड- २२५५८ गडचिरोली- २२४७०,बीड- २२०४४.वीजपुरवठ्यात अडचणी काय...नव्याने वाड्या-वसाहती झालेला भागअत्यंत दुर्गम भागांत वीजजोडणी देण्यात अडचणीअभयारण्य असलेल्या जिल्ह्यांत वनविभागाच्या परवानगीसाठी अडचणीआर्थिक स्थिती गरिबीची असल्याने वीजजोडणीसाठी मागणीच नाही. 

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने’तून १२ लाख कुटुंबांत वीजपुरवठा करता येईल अशा पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात झाली आहे. वीज पुरवठ्याचे राज्यात ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे.- किशोर शेगोकार, अधीक्षक अभियंताग्रामीण विद्युतीकरण विभाग