अनुकंपा नोकरीच्या आदेशांसाठी लाखोंचा ढपला, जिल्हा परिषद सीईओंसमोर सदस्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:53 AM2019-07-13T10:53:18+5:302019-07-13T10:54:50+5:30

अनुकंपा धोरणानुसार जिल्हा परिषदेकडून २३ जणांना नोकरीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये तुमच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या नावावर लाखो रुपयांचा ढपला पाडण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, सुभाष सातपुते आणि सदस्या शिल्पा खोत यांचे पती शशिकांत खोत यांनी केला आहे.

Lakhs of millions for compassionate job orders | अनुकंपा नोकरीच्या आदेशांसाठी लाखोंचा ढपला, जिल्हा परिषद सीईओंसमोर सदस्यांचा आरोप

अनुकंपा नोकरीच्या आदेशांसाठी लाखोंचा ढपला, जिल्हा परिषद सीईओंसमोर सदस्यांचा आरोप

Next
ठळक मुद्देअनुकंपा नोकरीच्या आदेशांसाठी लाखोंचा ढपलाजिल्हा परिषद सीईओंसमोर सदस्यांचा आरोप

कोल्हापूर : अनुकंपा धोरणानुसार जिल्हा परिषदेकडून २३ जणांना नोकरीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये तुमच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या नावावर लाखो रुपयांचा ढपला पाडण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, सुभाष सातपुते आणि सदस्या शिल्पा खोत यांचे पती शशिकांत खोत यांनी केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावरच हा आरोप करण्यात आल्याने त्यांनाही धक्का बसला.
आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्र्याच्या भाजप तालुकाध्यक्षांना निधी देण्याच्या निर्णयाविरोधात निवेदन देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीनंतर या सदस्यांनी मित्तल यांना हा खळबळजनक प्रकार सांगितला.

या तिघांनीही सांगितले की, आतापर्यंत २३ अनुकंपा नोकरीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रत्येकाकडून साडेतीन ते चार लाख रुपये घेण्यात आले आहेत. तुमच्या शेजारी दोस्त म्हणून बसून चहा घेतल्यानंतर संबंधितांना सीईओ साहेबांना आणि सामान्य प्रशासन विभागाला पैसे दिल्याशिवाय आदेश मिळणार नाही, असे सांगून हे पैसे उकळण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला.

अजूनही ४३ जणांच्या अनुकंपा नोकरीचे आदेश देणे बाकी आहे. किमान तेथे तरी हा प्रकार थांबवा, असे आवाहन या सदस्यांनी मित्तल यांना केले. याची दखल आपण घेतली असून, या संपूर्ण प्रकाराची आपण चौकशी करणार असल्याचे मित्तल यांनी पत्रकारांना सांगितले.

टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार
ज्यांच्या घरातील आधार हरवला आहे, अशांच्या घरामध्ये आपण अनुकंपा नोकरीसाठी आदेश देतो. त्यासाठी त्यांनी अनेक वर्षे वाट पाहिलेली असते. असे असताना त्यांना नोकरीचे आदेश देताना पैसे घेणे म्हणजे मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असल्याचा आरोप यावेळी सदस्यांनी केला.

समोर माणसं उभा करतो

ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. तुम्ही सांगाल तेव्हा तुमच्यासमोर पैसे दिलेली माणसे उभा करतो, असे आव्हानच यावेळी शशिकांत खोत यांनी दिले.

आताच सदस्यांनी हा प्रकार मला सांगितला. असे जर घडले असेल तर त्याची चौकशी करू. मात्र, अजूनही ४३ आदेश देणे बाकी आहे. मी यानिमित्ताने आवाहन करतो की, संबंधितांनी कुणालाही एक रुपयाही देऊ नये. या सर्वांना हे आदेश देण्यासाठी मी बांधिल आहे.
अमन मित्तल,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर.
 

 

Web Title: Lakhs of millions for compassionate job orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.