मेघोलीच्या नुकसानग्रस्तांना लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:32+5:302021-09-09T04:30:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली बंधारा फुटल्यानंतर नवले येथील एका महिलेसह आठ जनावरे वाहून ...

Lakhs aid to Megholi victims | मेघोलीच्या नुकसानग्रस्तांना लाखाची मदत

मेघोलीच्या नुकसानग्रस्तांना लाखाची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली बंधारा फुटल्यानंतर नवले येथील एका महिलेसह आठ जनावरे वाहून गेली होती. त्यानंतर माजी खासदार धनंजय महाडिक यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन एक लाखाची मदत जाहीर केली होती. दिलेला शब्द पाळत धनंजय महाडिक युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी बुधवारी ही मदत संबंधित कुटुंबीयांकडे सुपुर्द केली.

महाडिक यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज महाडिक यांनी मोहिते यांच्या घरी भेट देऊन, एक लाख रुपयांचा निधी प्रदान केला. जनावरे वाहून गेलेल्या निवृत्ती मोहिते यांना ५० हजार, जनाबाई मोहिते या मृत महिलेच्या कुटुंबाला ४५ हजार रुपये आणि तलाव फुटलेल्या कालावधीत जीव धोक्यात घालून मदतकार्य करणाऱ्या संतोष सुतार, प्रवीण पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, नामदेव मोहिते यांना पाच हजार रुपये देण्यात आले. संतोष सुतार यांना वैद्यकीय उपचारांसाठीही मदत करण्यात आली. यापुढेही महाडिक कुटुंबीय नेहमी सोबत असतील, अशी ग्वाही पृथ्वीराज महाडिक यांनी दिली.

यावेळी नाथाजी पाटील, राहुल देसाई, प्रवीणसिंह सावंत, अल्केश कांदळकर, प्रकाश वास्कर, बाजीराव देसाई, अनिल तळेकर, युवाशक्तीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, शशिकांत पाटील, प्रवीण आरडे, तुकाराम देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

०८०९२०२१ कोल पृथ्वीराज महाडिक

मेघोली तलाव दुर्घटनेत नुकसान झालेल्या नाईक कुटुंबीयांना महाडिक परिवारातर्फे बुधवारी एक लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला. यावेळी राहुल देसाई, नाथाजी पाटील, प्रवीणसिंह सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Lakhs aid to Megholi victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.