आलिशान कारसह एक लाखाचा मद्यसाठा जप्त
By Admin | Updated: October 13, 2014 00:43 IST2014-10-13T00:26:44+5:302014-10-13T00:43:05+5:30
दोघांना अटक, सोन्या मारुती चौक येथे कारवाई

आलिशान कारसह एक लाखाचा मद्यसाठा जप्त
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी करीत असताना बापू फ्रेंडस् सर्कल, सोन्या मारुती चौक येथे आॅडी कारमधून बीअरचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी आदित्य किरण पाटील (वय २५, रा. उजळाईवाडी, ता. करवीर) व अभय विठ्ठल नायक (२७, रा. सरदार कॉलनी, ताराबाई पार्क) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून आॅडी कारसह एक लाखाचा मद्यसाठा जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सर्वत्र नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिसांकडून सोन्या मारुती चौकात कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व चारचाकी वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी आॅडी कार (एमएच १२ जेएन १०१) ही संशयास्पद वाटल्याने तिला अडवून तपासणी केली असता, कारच्या पाठीमागील डिक्कीमध्ये बीअरचे ११ बॉक्स मिळून आले. त्यानुसार कारमधील दोघांना अटक केली.