सत्ताधाऱ्यांमुळेच ‘स्मार्ट सिटी’पासून वंचित
By Admin | Updated: October 19, 2015 00:26 IST2015-10-19T00:23:32+5:302015-10-19T00:26:27+5:30
चंद्रकांतदादा पाटील : भालकर यांच्या प्रचार कार्यालयाचा प्रारंभ

सत्ताधाऱ्यांमुळेच ‘स्मार्ट सिटी’पासून वंचित
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला कोणत्याही स्थितीत स्मार्ट सिटी बनविण्याचा आपण निर्धार केला आहे. त्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून, महापालिकेमध्ये भाजप-ताराराणी महायुतीची सत्ता त्यासाठी येणे गरजेचे आहे, असे उद्गार सहकारमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचार कार्यालय प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
टाकाळा खण क्रमांक ३८ मधील भाजपच्या उमेदवार सविता भालकर यांनी, परिसरामध्ये कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षांतील महापालिकेच्या कारभारावर तोफ डागली. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहराच्या विकासासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले आहेत. अनेक योजना पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. थेट पाणीपुरवठा योजना, झूम प्रकल्प, नदी-तलाव प्रदूषण अशा अनेक प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना झाली नाही. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये कोल्हापूर शहर सहभागी झाले होते. पण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कचरा उठाव अशा प्रलंबित मुद्द्यांमुळे कोल्हापूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होऊ शकला नाही. सत्ताधाऱ्यांचा निष्क्रियपणा कोल्हापूरच्या जनतेला विकासापासून वंचित ठेवणारा ठरला आहे. म्हणूनच आता परिवर्तनाची गरज आहे.
कोल्हापूर महापालिकेत भाजप-ताराराणी महायुतीची सत्ता आली तर मोठ्या प्रमाणात निधी आणून शहराचा कायापालट करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली. कोल्हापूर शहर स्मार्ट बनवून त्यांचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे.
याप्रसंगी सविता भालकर, विलास वास्कर, विजय जाधव, माणिक पाटील-चुयेकर, अनिल निगडे, रमेश जाधव, सुरेखा पाटील, बाबासाहेब शेलार, प्रशांत कुलकर्णी, शाबिरा जमादार, डॉ. रमेश निगडे, राजश्री निंबाळकर, हसीना बारगीर, जनार्दन भोसले, डॉ. दीपाली गायकवाड, श्रीकांत कुंभार, केदार गयावळ, अमर पाटील, सुभाष भोसले, सुभाष शेळके यांच्यासह नवचैतन्य तरुण मंडळ, फें्रडशिप गु्रप, स्वराज्य गु्रपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
टाकाळा खण