टीव्हीवरील शाळा संवादाचा अभाव, ऑनलाईन वर्ग सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:19+5:302021-07-11T04:18:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रूकडी माणगाव : माणगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने पहिली ते दहावीपर्यंत वर्ग दूरदृश्य प्रणालीद्वारे सुरू करण्यात आले ...

Lack of school communication on TV, start online classes | टीव्हीवरील शाळा संवादाचा अभाव, ऑनलाईन वर्ग सुरू करा

टीव्हीवरील शाळा संवादाचा अभाव, ऑनलाईन वर्ग सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्क

रूकडी माणगाव : माणगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने पहिली ते दहावीपर्यंत वर्ग दूरदृश्य प्रणालीद्वारे सुरू करण्यात आले आहे. पण यामध्ये संवादाचा अभाव असल्याने टीव्हीवरील शाळाऐवजी ऑनलाईन शाळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

माणगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग स्थानिक केबल नेटवर्कद्वारे सुरू करण्यात आले आहेत. हा उपक्रम स्तुत्य आहे, पण यामध्ये अडचणी वाढत आहेत. गणित, सायन्स व इंग्रजी विषयांतील सूत्र तसेच व्याकरण शिकवत असताना येणाऱ्या अडचणी व अडचणी विचारण्याचे तत्काळ सोय नसल्याने संवादाचा अभावामुळे दूरदृश्यप्रणालीमध्ये अडचणी वाढत आहेत.

येथील ग्रामपंचायतीने स्थानिक केबल नेटवर्क शाळेत शिकवणार शिक्षक यांचे चित्रण दूरदृश्यद्वारे दाखविण्यात येण्याचे उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये शिक्षक शिकवणार आणि विद्यार्थी ऐकणार अशी पद्धत असून यामध्ये विद्यार्थी यांना येणारे अडचणी विचारण्याचे सोय नाही.

तसेच रूकडीवाडी, माणागववाडी, साजणी येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येते येत असतात; पण येथील स्थानिक केबल साजणीत नसल्याने तेथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच शिक्षक वर्गातून पाल्य ऑनलाईन सहभागी झाले तर त्याची नोंद ठेवता येते. तसेच त्याच्याबरोबर संवाद व दररोजचा अभ्यास देता येतो, असे मत असून दूरदृश्यऐवजी ऑनलाईन शिक्षण असावे असे मत आहे.

स्थानिक केबलमध्ये प्रक्षेपण मध्ये अडथळा, तसेच काही जणाकडे असलेला डिश अॅटेना आणि टीव्ही ऐवजी मुले बाहेर राहत असल्याने टीव्हीवरील शाळेस अडथळा येत असून पालकवर्गातून ऑनलाईन शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया

टीव्हीवरील शाळा माध्यमातून शिक्षक वर्गात शिकवणार आणि पाल्य घरी ऐकणार या सुविधामध्ये पाल्यांना येणारे अडचणी शिक्षक यांना विचारण्याचे सोय नसल्याने व केबल प्रक्षेपणमध्ये अडथळा येत असल्याने टीव्हीवरील शाळाऐवजी ऑनलाईन शिक्षण सुरू करावे.

- महावीर देमाण्णा पालक.

टीव्हीवरील शाळा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण घेता यावे, याकरिता हा प्रयत्न सुरू केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवलेले विषयामधील कळाले नसेल त्यानी क्लास झाल्यानंतर शिक्षकांना फोनवरून शंका समाधान करून घ्यावे.

राजू मगदूम, सरपंच, माणगाव

Web Title: Lack of school communication on TV, start online classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.