राधानगरी तालुक्यात ऑक्सिजन सुविधेची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST2021-05-19T04:25:34+5:302021-05-19T04:25:34+5:30
तालुक्यात कोठेही व्हेंटिलेटरची सुविधा नाही. या स्थितीत गंभीर रुग्णांना कोल्हापूर, भोगावती येथील खासगी दवाखान्यांशिवाय पर्याय नाही. आजपर्यंत कोरोना ...

राधानगरी तालुक्यात ऑक्सिजन सुविधेची वानवा
तालुक्यात कोठेही व्हेंटिलेटरची सुविधा नाही. या स्थितीत गंभीर रुग्णांना कोल्हापूर, भोगावती येथील खासगी दवाखान्यांशिवाय पर्याय नाही.
आजपर्यंत कोरोना झालेले ५१५ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २९४ बारे झाले असून ६ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ग्रामीण रुग्णालयात ७, आंबेडकर वसतिगृहात ६६, कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात २ व घरी ३९ असे १२५ रुग्ण सक्रिय आहेत. ४८ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत.
उपचाराचा खर्च जास्त
शासकीय उपचार केंद्रात आतापर्यंत ६ रुग्णांचा मृत्यू झालेला असला तरी तालुक्यातील एकूण मृत्यूंचा आकडा तीसच्या पुढे आहे. बाकीचे रुग्ण कोल्हापूर व अन्य ठिकाणी खासगी ठिकाणी उपचार घेताना दगावले आहेत. खासगी ठिकाणी उपचार घेण्यासाठी दीड ते तीन लाखांहून अधिक रक्कम खर्च करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. तरीही येथे जास्त मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी होणारे उपचार, कशाप्रकारे होतात याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.
सतर्कता कमी
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत गतवर्षीच्या तुलनेत कमी सतर्कता आहे. गाव पातळीवरही फारशी उपाययोजना नाही. त्यामुळे अनधिकृतरीत्या रुग्णांची संख्या यापेक्षा जास्त आहे. अनेक गावांत घरपती रुग्ण आहेत. त्यातील काही मृत्यूही झालेले आहेत; मात्र त्यांची नोंद होत नाही.