निधीअभावी प्रकल्प बंद भाग - दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:17+5:302021-02-16T04:24:17+5:30

घन:शाम कुंभार : यड्राव कचरा डेपोमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रीय खतनिर्मिती केली जात होती व उर्वरीत घटकांचे विविध कारणांसाठी ...

Lack of funds for closed projects - two | निधीअभावी प्रकल्प बंद भाग - दोन

निधीअभावी प्रकल्प बंद भाग - दोन

घन:शाम कुंभार : यड्राव

कचरा डेपोमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रीय खतनिर्मिती केली जात होती व उर्वरीत घटकांचे विविध कारणांसाठी झालेल्या उपयोगामुळे कचरा डेपोच्या बराच भागाने मोकळा श्वास घेतला होता. परंतु सुमारे एक वर्षापासून कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प बंद पडला आहे. शासकीय निधी उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्न जोर धरत नाहीत. त्यांच्या प्रयत्नावरच पुन्हा प्रकल्प सुरू होण्याची आशा आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा बायोमायनिंग प्रकल्प तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नातून सुरूझाला होता. या प्रकल्पामुळे कचरा डेपोतील कचऱ्याचे विलगीकरण करून त्यातून सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात आली होती. प्लास्टिक, फायबरवर प्रक्रिया करून इंधनासाठी त्याचा वापर करण्यात आला व उर्वरित कचरा भू-भरावासाठी वापरण्यात आला होता. यामुळे दोन लाख क्युबिक मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया झाल्याने कचरा डेपोचा बराच भाग एका मैदानासारखा बनला आहे. सध्या हा प्रकल्प बंद पडल्याने कचरा तसाच साठून राहिला आहे. शासन पातळीवर निधी उपलब्ध झाला नसल्याने हा प्रकल्प बंद पडल्याचे सांगण्यात येते. (क्रमश:)

चौकट - निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न

बायोमायनिंग प्रकल्प नगरविकास खात्याकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने थांबला आहे. निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे इचलकरंजी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीतदत्त संगेवार यांनी सांगितले. कोट - सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. कचरा डेपो या परिसरातून काढून टाकावा. हा कचरा डेपो नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. - डॉ. आरती कोळी कोट - निधीअभावी प्रकल्प बंद पडतो. म्हणजे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. प्रकल्पाला निधी कमी पडू नये, प्रकल्प सुरू रहावा. जनतेची दिशाभूल करू नये. - रोहित कदम माजी ग्रा. पं. सदस्य, यड्राव फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - बायोमायनिंग प्रकल्पामुळे कचरा डेपोचे सेंद्रीय खत व इतर घटकांमध्ये रूपांतर झाल्याने निम्मा कचरा डेपो स्वच्छ व सुंदर मैदान बनले आहे. (छाया- घन:शाम कुंभार, यड्राव)

Web Title: Lack of funds for closed projects - two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.