मजुरांची मुलंही देणार स्पर्धा परीक्षा

By Admin | Updated: December 14, 2014 23:51 IST2014-12-14T21:19:11+5:302014-12-14T23:51:16+5:30

पुस्तकांचे संच देणार : कामगार कल्याण मंडळाचा पुढाकार

The laborers' children will also compete in competitive examinations | मजुरांची मुलंही देणार स्पर्धा परीक्षा

मजुरांची मुलंही देणार स्पर्धा परीक्षा

दत्तात्रय पाटील - म्हाकवे --बांधकाम क्षेत्रातील मजुरांसह त्यांच्या मुलांच्या आर्थिक ओढाताणीमुळे शैक्षणिक तसेच आरोग्याचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने त्यांना शिष्यवृत्ती आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. आता त्यामुळे या मजुरांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास घरच्या घरी करता यावा यासाठी मार्गदर्शक पुस्तके दिली जाणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजारांहून अधिक मजुरांची नोंद झाली असून, पहिल्या टप्प्यात १३ हजार मजुरांच्या मुलांना या मार्गदर्शक पुस्तकांचा संच दिला जाणार आहे. यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी शब्दकोश, स्पर्धा परीक्षेसंदर्भातील पुस्तकांसह लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण करणाऱ्या गप्पा-गोष्टी, अशा नऊ पुस्तकांचा हा एक हजार रुपये किमतीचा संच विनामूल्य दिला जाणार आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासह बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या मुलांना कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घेणे अथवा महागडी पुस्तके खरेदी करणे अशक्य असते. याचा शासन स्तरावर विचार होऊन इमारत व इतर बांधकाम मंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व नोंदीत कामगारांच्या मुलांना या पुस्तकांचे संच देण्यात येणार आहेत.


जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या मुलांचे उज्ज्वल करिअर व्हावे, यादृष्टीने शासनाने दिलेल्या पुस्तक संचाचे तालुकानिहाय वितरण सुरू आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या वितरणाला वेळ लागत असून, लवकरात लवकर सर्वांना हे संच दिले जाणार आहेत. योग्य विनिमय झाल्यास मजुरांसह त्यांच्या मुलांना पुस्तकांचे हे संच दिशादर्शक ठरणारे आहेत. - सुहास कदम, सहायक कामगार आयुक्त, कोल्हापूर.

Web Title: The laborers' children will also compete in competitive examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.