महागाईविरोधात मजदूर संघाची धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:36+5:302021-09-09T04:30:36+5:30
कोल्हापूर : वाढत्या महागाईविरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने बुधवारी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जीवनावश्यक ...

महागाईविरोधात मजदूर संघाची धरणे
कोल्हापूर : वाढत्या महागाईविरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने बुधवारी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा, महागाईवर नियंत्रण आणा, असंघटित क्षेत्रातील कामगारांना १० हजार रुपये अनुदान द्या, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा, भाववाढीवर नियंत्रण आणा, पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणा, वस्तूंवर उत्पादन खर्च छापण्याची सक्ती करा, घरेलू, बांधकाम, फेरिवाले, रिक्षा-टॅक्सी चालक, माळी, सोनार, कारागीर, शिंपी अशा असंघटित क्षेत्रातील कामगारांना १० हजार रुपये अनुदान द्या, सार्वजनिक व खासगी उद्योगातील कामगारांना कामाच्या प्रमाणात मोबदला द्या, शेतमालाला योग्य हमीभाव द्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष एस. एन. पाटील, मुकुंद जोशी, अभिजित केकरे, अनुजा धरणगावकर, अपर्णा कोडगुले, अरुण नागराळे, विष्णुपंत जोशीलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--
फोटो नं ०८०९२०२१-कोल-मजदूर संघ
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी भारतीय मजदूर संघाच्या वतीने वाढत्या महागाईविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
--