कुरुंदवाड पालिकेचा ५६ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST2021-02-26T04:36:15+5:302021-02-26T04:36:15+5:30

अंदाजपत्रकाचे वाचन लेखापाल महादेव आंबी यांनी केले. कर व महसूल यातून २ कोटी ६४ लाख २० हजार, अभिहस्तांकित महसूल ...

Kurundwad Municipal Corporation's budget of 56 crores | कुरुंदवाड पालिकेचा ५६ कोटींचा अर्थसंकल्प

कुरुंदवाड पालिकेचा ५६ कोटींचा अर्थसंकल्प

अंदाजपत्रकाचे वाचन लेखापाल महादेव आंबी यांनी केले. कर व महसूल यातून २ कोटी ६४ लाख २० हजार, अभिहस्तांकित महसूल आणि भरपाई १ लाख ३ हजार, महसुली अनुदाने अंशदाने आणि अर्थसहाय ५ कोटी २८ लाख २५ हजार, नगरपरिषद मालमत्तापासून भाड्याचे उत्पन्न ५८ लाख ५० हजार रुपये अपेक्षित आहे. तर भांडवली जमेतून ९ कोटी ३७ लाख १२ हजार महसुली जमा दाखविण्यात आले आहे.

९ कोटी ३२ लाख ९५ हजार रुपये महसुली खर्च दाखविण्यात आला आहे, तर स्थिर व जंगम मालमत्ता ३२ कोटी २७ लाख, इतर दायित्व ४ कोटी ६९ लाख ५६ हजार असा ३६ कोटी ९६ लाख ५६ हजार रुपये भांडवली खर्च दाखविण्यात आला असून, १० कोटी ३९ लाख ५३ हजार ३०३ रुपयाच्या शिलकी अंदाजपत्रकास सभागृहाने मंजुरी दिली.

सभेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मजबुतीकरण व आंबेडकर पुतळा सुशोभिकरण, तबक उद्यानात खेळाचे मैदान बंदिस्त करण्यासाठी गेट व रोलर खरेदीसाठी तसेच अनुषंगिक कामे करण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करावा, अशी सूचना नगरसेवक दीपक गायकवाड, डॉ. सुनील चव्हाण व अक्षय आलासे यांनी मांडली.

मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रशासकीय बाजू मांडली. चर्चेत उपनगराध्यक्ष फारुख जमादार, जवाहर पाटील, उदय डांगे, किरणसिंह जोंग आदींनी भाग घेतला.

Web Title: Kurundwad Municipal Corporation's budget of 56 crores