कुरुंदवाडमध्ये नियम मोडणा-यांकडून साडेतीन लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:15+5:302021-07-01T04:17:15+5:30
दरम्यान शहरातील आस्थापनांनी स्वॅब तपासणी करून घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष जयराम पाटील उपनगराध्यक्ष सुनील चव्हाण यांनी ...

कुरुंदवाडमध्ये नियम मोडणा-यांकडून साडेतीन लाखांचा दंड वसूल
दरम्यान शहरातील आस्थापनांनी स्वॅब तपासणी करून घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष जयराम पाटील उपनगराध्यक्ष सुनील चव्हाण यांनी केले आहे.
मुख्याधिकारी जाधव म्हणाले, शहरातील कोरोना संसर्गाला नियंत्रित ठेवण्यासाठी पालिका प्रशासन सतर्क राहून कोरोना निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केल्याने शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.
शहरात विनाकारण विनामास्क फिरणा-यांवर ५०० रुपये तर नियमबाह्य आस्थापना सुरू करणा-यांवर एक हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. तीन महिन्यांत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी आजपासून स्वॅब तपासणी करण्याचे आदेश दिले असून शहरात दररोज ९० अॅन्टिजन तर सहा स्वॅब तपासण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी जाधव यांनी दिली.