कुपेकर, मिणचेकर, पी. एन., कोरे यांची प्रतिष्ठा
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-23T23:59:43+5:302015-07-25T01:13:29+5:30
गावांचे राजकारण : सत्तेसाठी सरसावले मातब्बर; ‘आर या पार’ची लढाई

कुपेकर, मिणचेकर, पी. एन., कोरे यांची प्रतिष्ठा
राजाराम लोंढे - कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाबरोबर जिल्ह्याचे राजकारण करणाऱ्या नेतेमंडळींची गावातील सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे कानडेवाडी, आमदार सुजित मिणचेकर यांचे मिणचे, माजी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार संपतराव पवार यांचे सडोली खालसा, माजी मंत्री विनय कोरे व माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील हे कोडोलीच्या सत्तेसाठी सरसावले आहेत. ग्रामपंचायत ही राजकारणाचा पाया मानला जातो. ज्याची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता त्याची तालुका पातळीवरील राजकारणात चलती असते. त्यामुळे नेतेमंडळी राजकारणात कितीही उच्चपदावर पोहोचली, तरी त्यांना गावातील सत्ता महत्त्वाची वाटत असते. सध्या जिल्ह्यातील सुमारे चारशे ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांच्या गावातील निवडणुकाही लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आमदार संध्यादेवी कुपेकर यांची कानडेवाडीची निवडणूक रंगतदारपणे सुरू आहे. येथे थेट कुपेकर कुटुंबातच पुन्हा सामना आहे. ग्रामपंचायत लहान असली तरी सत्तेत प्रतिष्ठा असल्याने दोन्ही गटांनी ताकद पणाला लावली आहे. माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या चन्नेकुप्पीमध्ये स्थानिक आघाडीने आव्हान दिले आहे. नूलमध्ये माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या आघाडीसमोर सेना-भाजपचे आव्हान आहे. डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या कौलगेतही सत्तेसाठी ‘आर या पार’ची लढाई सुरू आहे.
गगनबावडा तालुक्यात सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने वेतवडे ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत होत आहे. येथे जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे व माजी सभापती गुंडा कांबळे यांच्यातच सरळ सामना आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रिया वरेकर यांचीही गगनबावडा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यात लक्षवेधी असलेल्या कोडोली ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री विनय कोरे व माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्यात अस्तित्वाची लढाई होत आहे. पोर्लेमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश पाटील व बाजार समितीचे संचालक परशराम खुडे यांच्यात