शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी नोंदीने रक्तसंबंधातील नातेवाइकांना मिळणार दाखला, एक नोंद अनेकांसाठी उपयोगी 

By भीमगोंड देसाई | Updated: November 23, 2023 15:53 IST

भीमगोंड देसाई कोल्हापूर : शासनातर्फे कुणबी नोंद शोधमोहिमेमुळे कुणबी दाखला मिळवणे सोपे झाले आहे. एका नोंदीमुळे थेट रक्तसंबंधातील सर्व ...

भीमगोंड देसाईकोल्हापूर : शासनातर्फे कुणबी नोंद शोधमोहिमेमुळे कुणबी दाखला मिळवणे सोपे झाले आहे. एका नोंदीमुळे थेट रक्तसंबंधातील सर्व नातेवाइकांना दाखला मिळणार आहे. यासाठी रितसर अर्ज करावा लागणार आहे. अर्जासोत वंशावळ (वडील, आजोबा, पणजोबा) काढून ती पुराव्यानिशी जुळवावी लागणार आहे. याशिवाय आवश्यक कागदपत्रे जोडल्यास प्रांताधिकाऱ्यांकडून दाखला दिला जात आहे.कुणबी नोंद शोधमोहिमेनंतर गावनिहाय नावानिशी माहिती जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कुणबी दाखला काढण्यासाठी सापडलेल्या नोंदीचा पुरावा म्हणून वापर करता येणार आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइक (तुमचे वडील / चुलते / आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते / आत्या, आजोबांचे चुलते / आत्या, पणजोबांचे चुलते / आत्या, खापर पणजोबांचे चुलते / आत्या आदी.) यापैकी कुठल्याही एका नातेवाइकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. यापैकी एकाची जरी कुणबी नोंद आढळल्यास सर्व रक्तातील नात्यांना दाखला मिळणार आहे.

दरम्यान, सध्या मोहिमेत कुणबी नोंद शोधण्यासाठी रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश किंवा शाळा सोडल्याचा दाखला पाहिला जात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्म-मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. यामुळे ग्रामपंचायतीतही कुणबी नोंद शोधली जात आहे.जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदीतही जातीचा उल्लेख आढळतो. रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा दाखल्यासाठी चालतो. म्हणून या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

दाखला काढण्यासाठी झुंबड उडणार

गावनिहाय नावे जाहीर केल्यानंतर मोहिमेत १० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात १४ हजार १८४ कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र, त्या कोणत्या गावातील आहेत. त्यांची नावे काय आहेत, हे अजूनही प्रशासनाने जाहीर केलेले नाही. आता तर रोज सापडणाऱ्या नोंदीची संख्याही गोपनीय राखली जात आहे. ही सर्व माहिती नावनिहाय जाहीर झाल्यानंतर कुणबीचा दाखला काढण्यासाठी झुंबड उडणार आहे.आत्याचा नवरा, मुलांना नाही..वडिलांची कुणबी म्हणून नोंद आढळल्यास मुलगा, मुलगी आणि आत्याला दाखला मिळणार आहे. पण आत्याचा नवरा आणि मुलांना दाखला मिळणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणCaste Certificateजात वैधता प्रमाणपत्र