शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीहून अधिक आवर्तनांसह कुंकुमार्चन, स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांचे मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:41 IST

समारोप आज 

कोल्हापूर : सकाळचे प्रसन्न, मंगलमय वातावरण; गणपती अर्चना, ललितासहस्रनामाची आवर्तने, महापूजा अशा विविध धार्मिक विधींनी शुक्रवारपासून श्री विद्याकोटी कुंकुमार्चन महायज्ञाला सुरुवात झाली. त्रिपुरसुंदरी श्री ललितामातेचे उपासक स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ललितासहस्रनामाची एक कोटीहून अधिक आवर्तने व कुंकुमार्चन विधी होत आहे. यावेळी स्वामीजींनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या पवित्र नगरीत हा महायज्ञ होत असल्याबद्दल आनंद असल्याची भावना व्यक्त केली.विश्वपंढरी येथे सकाळी नऊ वाजल्यापासून या कुंकुमार्चन साेहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी स्वामी अभिषेक ब्रह्मचारी, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती सुमनश्याम, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहितकुमार सिंग उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी न्यायमूर्तींनी विश्वशांती, समाजकल्याणासाठी होत असलेल्या या महायज्ञाला शुभेच्छा दिल्या. ललित गांधी यांनी कोल्हापुरात हा साेहळा हाेत असून, ही सौभाग्याची गोष्ट आहे, असे मत मांडले. या कुंकुमार्चन साेहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषा करून कोल्हापुरातील महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. आज, शनिवारी या महायज्ञाचा अखेरचा दिवस असून, अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

युवा पिढीचा अध्यात्माकडे वाढता ओढा सकारात्मकयावेळी स्वामी अभिषेक ब्रह्मचारी म्हणाले, भारताला लाभलेले सनातन धर्म, अध्यात्म हे सर्वश्रेष्ठ आहे. जगभरात धर्माच्या आधारे यादवी माजलेली असताना भारतीय संस्कृतीने धर्माची खरी परिभाषा जपली आहे. नव्या पिढीचा ओढा अध्यात्माकडे वाढला आहे. ते हे ज्ञान समजून घेत आहेत, त्याचे जीवनात आचरण करत आहेत, ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे. भलेही रीलच्या माध्यमातून असेल; समाजमाध्यम, इंटरनेटचा वापर करून का असेना, नवी पिढी भारतीय संस्कृतीचे जतन करत आहे, हे महत्त्वाचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kunkumarchan with Over One Crore Recitations Held Under Swami's Guidance

Web Summary : Kolhapur witnessed the Shri Vidyakoti Kunkumarchan Mahayagya, guided by Swami Abhishek Brahmachari. The event features over one crore recitations of Shri Lalitasahasranama and Kunkumarchan rituals. Swami expressed joy in holding the event in Kolhapur, with increased spiritual interest from the younger generation.