कुंभोज ग्रामपंचायतीचा बाजारास अटकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:47+5:302021-05-28T04:18:47+5:30

कुंभोज: येथील दीपक चौकात दररोजच भरणाऱ्या बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी ...

Kumbhoj Gram Panchayat's blockade of the market | कुंभोज ग्रामपंचायतीचा बाजारास अटकाव

कुंभोज ग्रामपंचायतीचा बाजारास अटकाव

कुंभोज: येथील दीपक चौकात दररोजच भरणाऱ्या बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन बाजार भरण्यास अटकाव केल्याने गुरुवारी सकाळी भरणारा बाजार आज भरला नाही. ‘लोकमत’मध्ये कुंभोजमध्ये दररोजच भरतोय बाजार या आज प्रसिद्ध झालेल्या बातमीची तातडीने दखल घेऊन ही कारवाई केली.

कुंभोजमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना दीपक चौकासह बाजारपेठेत भरणाऱ्या नित्य बाजारामुळे खासकरून दीपक चौकात बाजारकरूंसह वाहनधारकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती. ग्रामपंचायतीने चौकाचौकांत बसून तसेच फिरून भाजीपाला विकण्याच्या आवाहनास विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने बाजार भरू लागला.

आज सकाळी ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी भाजीपाला विक्रेत्यांस बाजार पेठेत भाजीपाला विक्री करण्यास मज्जाव केला. विक्रेत्यांना बसस्थानक चौकात पर्यायी जागा दिल्याने सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी सामंजस्याच्या भूमिकेतून ग्रामपंचायतीस सहकार्य केले.

Web Title: Kumbhoj Gram Panchayat's blockade of the market