कुंभी-कासारीने कर्मचाऱ्यांचे हित जोपासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:29+5:302021-09-18T04:25:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे -साखर कामगारांच्या वेतनश्रेणीचा मसुदा कुंभी-कासारी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी त्रिपक्षीय वेतन कराराच्या बैठकीत ...

कुंभी-कासारीने कर्मचाऱ्यांचे हित जोपासले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे -साखर कामगारांच्या वेतनश्रेणीचा मसुदा
कुंभी-कासारी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी त्रिपक्षीय वेतन कराराच्या बैठकीत जोरदार बाजू मांडून वेतन कराराला मूर्त स्वरूप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याबद्दल व कुंभी-कासारी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना मसुदा मिळताच वेतन करार लागू करण्याची ग्वाही दिल्यानंतर कामगार संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष चंद्रदीप नरके म्हणाले, साखर उद्योगापुढे मोठी आर्थिक संकटे उभी राहिली असली, तरी साखर कामगारांचे या उद्योगात मोठे योगदान आहे. त्यांच्या घामाचे दाम हे हक्काचे असून, झालेल्या वेतन कराराचा मसुदा साखर आयुक्तालयातून मिळताच तो लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
कामगार प्रतिनिधी अविनाश पाटील म्हणाले, कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या माध्यमातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी कामगारांचे हित जोपासण्याबरोबर त्यांच्या हक्कांची जपणूक केलेली आहे. याहीवेळी त्यांच्या प्रयत्नांमुळे साखर कामगारांचा प्रलंबित वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे सांगितले.
यावेळी कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर, संचालक जयसिंग पाटील, विलास पाटील, वेलफेअर ऑफिसर देसाई संघटनेचे उपाध्यक्ष संदीप भोसले, कामगार प्रतिनिधी सखाराम पाटील, सरदार पाटील, विलास गुरव, हिंदुराव पाटील उपस्थित होते.
फोटो -
कुंभी-कासारीचे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी साखर कामगार वेतन करारासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल कारखान्याच्या कामगार संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला
१७ कुंभी चंद्रदीप नरके