शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंभी’, गडहिंग्लजची रणधुमाळी; ‘राजाराम’ची निवडणूक न्यायालयीन निकालावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 13:30 IST

चौथ्या, पाचव्या व सहाव्या टप्प्यातील सर्व वर्गांतील संस्थांच्या निवडणुका ३१ जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सहकारी प्राधिकरणाने दिले आहेत.

कोल्हापूर : विकास संस्थांच्या निवडणुका प्राधान्याने घेण्यासाठी प्रलंबित ठेवलेल्या इतर संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया शुक्रवार (दि. १) पासून सुरू होत आहे. चौथ्या, पाचव्या व सहाव्या टप्प्यातील सर्व वर्गांतील संस्थांच्या निवडणुका ३१ जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सहकारी प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार, कुंभी कासारी साखर कारखाना, कोल्हापूर अर्बन बँक, शिक्षक बँक, कोजिमाशि पतसंस्थांची प्रक्रिया सुरू होणार आहे. हे जरी खरे असले, तरी प्रारूप यादी, अंतिम यादी आणि प्रत्यक्षात मतदान होण्यास पावसाळा उजाडणार आहे.कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र, ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाल्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार विकास संस्थांच्या निवडणुका प्राधान्याने घेतल्या जात आहेत. त्यामुळे गेले तीन महिने इतर संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे ठप्प होत्या. मात्र, विकास संस्थांच्या निवडणुका सुरूच राहणार आहेत. त्याचबरोबर, इतर प्रकारातील चौथ्या, पाचव्या, सहाव्या टप्प्यांतील प्रलंबित संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे. या निवडणुका ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.

त्यानुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील चौथ्या, पाचव्या, सहाव्या टप्प्यात प्रलंबित संस्थांंच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ‘कुंभी’ कारखाना, कोल्हापूर अर्बन, शिक्षक बँक, कोजिमाशि पतसंस्थांसह इतर संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

एप्रिल, २०२० पर्यंतचे मतदार पात्रशुक्रवारपासून सुरू होणाऱ्या संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीची अर्हता दिनांक १ एप्रिल, २०२२ असून, या मागे दोन वर्षे म्हणजे १ एप्रिल, २०२० पर्यंतची यादी मतदानासाठी पात्र राहणार आहे.

‘राजाराम’ची निवडणूक न्यायालयीन निकालावर

राजाराम कारखाना मतदार यादीचा वाद न्यायालयात आहे. हा कारखाना पहिल्या टप्प्यात आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने तेथील निकालावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र संस्था -

  • साखर कारखाने - ८ (राजाराम, कुंभी, गडहिंग्लज, सह्याद्री, इंदिरा गांधी, आजरा, भोगावती, गायकवाड)
  • नागरी बँका - २१ (कोल्हापूर अर्बन, प्राथमिक शिक्षक आदी)
  • ‘ब’ वर्गीय पतसंस्था - ५२ (कोजिमाशि, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी, ग्रामसेवक)
  • प्रक्रिया, औद्योगिकसह इतर - ५२०
  • ‘पदुम’ - ५५०
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक