कुंभी बँकेचा ११ टक्के लाभांश जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:36+5:302021-09-17T04:29:36+5:30
बँकेच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा कुंभी बँकेचा ११ टक्के लाभांश जाहीर. अध्यक्ष अजित नरके बँकेच्या ४५ व्या ...

कुंभी बँकेचा ११ टक्के लाभांश जाहीर
बँकेच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा
कुंभी बँकेचा ११ टक्के लाभांश जाहीर.
अध्यक्ष अजित नरके
बँकेच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा
अध्यक्ष अजित नरके :
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कुंभी बँकेला अहवाल सालात निव्वळ नफा ७५ लाख ७१ हजार रुपयांचा झाला आहे. कोरोनाच्या काळात सर्व सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार व कर्मचारी, संचालक यांनी कार्यक्षमतेने काम केले आहे. यामुळे बँकेची प्रगतीची घोडदौड सुरू आहे. सभासदांना यावर्षी ११ टक्के लाभांश दिला जाणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी जाहीर केले.
कुडित्रे, ता. करवीर येथील बँकेच्या मुख्य सभागृहात बँकेचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या अध्यक्षतेखाली ४५व्या वार्षिक सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नोटीस वाचन कार्यकारी संचालक डी. एस. राऊत, तर इतिवृत्त वाचन प्रवीण पोतदार यांनी केले. यावेळी अध्यक्ष अजित नरके म्हणाले, बँकेकडे ९१ कोटी ५१ लाखांच्या ठेवी आहेत. ५५ कोटी ७२ लाख रुपये कर्जे वाटप करण्यात आली आहे. पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असून, बँकेकडे असणाऱ्या अशा ८५ टक्के ठेवी विमा संरक्षणात आहेत. अण्णासाहेब महामंडळाची कर्ज योजना जिल्ह्यात सर्वप्रथम कुंभी बँकेने सुरू केली. आठ कोटी मराठा समाजातील तरुणांनी घेतली असून, एकही कर्ज थकबाकीत नाही, असे सांगितले.
यावेळी सदाशिव शेलार, भीमराव नाळे, के. डी. पाटील यांच्यासह अनेक सभासदांनी सहभाग नोंदवला. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
160921\20210916_141859.heic
कुडित्रे ता. करवीर येथील कुंभी बँकेच्या ४५ व्या वार्षिक सभेत बोलताना बँकेचे अध्यक्ष अजित नरके,शेजारी उपाध्यक्ष अरुण पाटील व सर्व संचालक