कदम अकॅडमीची स्पोर्टस प्रमोशनवर मात
By Admin | Updated: April 3, 2015 23:57 IST2015-04-03T23:30:44+5:302015-04-03T23:57:18+5:30
अमर ढाल क्रिकेट स्पर्धा : पाटील, कदम चमकले

कदम अकॅडमीची स्पोर्टस प्रमोशनवर मात
कोल्हापूर : रमेश कदम क्रिकेट अकॅडमीने कोल्हापूर स्पोर्टस प्रमोशन संघाचा ८ गडी राखून पराभव करीत अमर ढाल ( दोनदिवसीय) क्रिकेट स्पर्धेची पुढील फेरी गाठली. वैभव पाटीलने दोन्ही डावांत १६१ धावा केल्या, तर स्वप्निल कदमने १२ बळी घेतले.शाहूपुरी जिमखाना येथे शुक्रवारी कदम अकॅडमी व स्पोर्टस प्रमोशन यांच्यात झालेल्या सामन्यात पहिल्या डावात स्पोर्टस प्रमोशन संघाने ३२.१ षटकांत सर्वबाद १४० धावा केल्या. यामध्ये रोहित पाटील ४८, अनिकेत हतकर १६ धावा केल्या; तर कदम अकॅडमीकडून स्वप्निल कदमने ५, मंजुनाथ यादव, बुऱ्हानुद्दीन भारमल, अमृत कार्इंगडे व सत्यम तळेकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कदम अकॅडमीकडून पहिल्या डावात ६२. २ षटकांत सर्वबाद २१४ धावा केल्या. यामध्ये वैभव पाटीलने नाबाद ११५, नामदेव मंडलिक ३४, मंजुनाथ यादव १४ धावा केल्या. स्पोर्टस प्रमोशनकडून रोहित पाटीलने ५, प्रसाद सापळेने ३, तर अनिकेत हतकर व विजयसिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. स्पोर्टस प्रमोशनने दुसऱ्या डावात ३२.४, ठकांत सर्वबाद १५७ धावा केल्या. यामध्ये विजयसिंगने ५६, रोहित पाटीलने ४५, अजय भोपळेने १४ धावा केल्या. कदम अकॅडमीकडून दुसऱ्या डावात १२.५ षटकांत २ बाद ८७ धावा करीत स्पोर्टस प्रमोशन संघावर ८ गडी राखून विजय संपादन केला.
संक्षिप्त धावफलक
स्पोर्टस प्रमोशन:पहिला डाव ३२.१ षटकांत सर्वबाद १४०. रोहित पाटील ४८, अनिकेत हतकर १६.
कदम अकॅडमी पहिला डाव ६२. २ षटकांत सर्वबाद २१४ धावा. वैभव पाटील नाबाद ११५, नामदेव मंडलिक ३४, मंजुनाथ यादव १४ .