केएसए जिल्हा संघाची जळगाव संघावर मात

By Admin | Updated: January 30, 2015 00:15 IST2015-01-30T00:05:07+5:302015-01-30T00:15:29+5:30

आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप

KSA District team beat Jalgaon team | केएसए जिल्हा संघाची जळगाव संघावर मात

केएसए जिल्हा संघाची जळगाव संघावर मात

कोल्हापूर : हिंगोली येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आंतर जिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये आज, गुरुवारी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या जिल्हा संघाने जळगाव जिल्हा संघावर ४-२ अशी मात केली.
सामन्याच्या पूर्वार्धात के.एस.ए.च्या आकाश भोसलेने कपिल साठे व रोहित कुरणे यांच्या पासवर अनुक्रमे २२ व्या व ७१ व्या मिनिटाला गोल केला. उत्तरार्धात रोहित कुरणेने आकाश भोसलेच्या पासवर सामन्याच्या ५५ व ५७ व्या मिनिटास गोल नोंदवून संघास ४-२ अशा गोलफरकाने विजयी केले. के. एस. ए. कडून शकील पटेल, अमृत हांडे, सचिन बारामती, सुमित घाटगे, रोहित कुरणे यांनी मध्यम फळीत तर कपिल साठेने आघाडीच्या फळीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. के.एस.ए. संघाने यापूर्वी धुळे संघावर मात केली आहे तर उद्या मुंबई संघाबरोबर सामना होणार आहे. या सामन्यातील जय-पराजयावर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: KSA District team beat Jalgaon team