कृष्णराज महाडिकचे यू ट्यूबचे मानधन नाभिक समाजाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:18+5:302021-06-18T04:17:18+5:30

कोल्हापूर : ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून मिळालेल्या मानधनातून वंचित, कष्टकरी आणि गरजूंना सहाय्य करण्याचा अनुकरणीय उपक्रम रेसर कृष्णराज महाडिक याने ...

Krishnaraj Mahadik's YouTube honorarium to the nuclear community | कृष्णराज महाडिकचे यू ट्यूबचे मानधन नाभिक समाजाला

कृष्णराज महाडिकचे यू ट्यूबचे मानधन नाभिक समाजाला

कोल्हापूर : ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून मिळालेल्या मानधनातून वंचित, कष्टकरी आणि गरजूंना सहाय्य करण्याचा अनुकरणीय उपक्रम रेसर कृष्णराज महाडिक याने राबवला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील दीडशेहून अधिक नाभिक समाजबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. कृष्णराज हा माजी खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे.

कृष्णराज हा रेसर असून, तो आपल्या कुटुंबातील विविध प्रसंगावर तसेच विविध सामाजिक घटनांवर चित्रफिती बनवून ब्लॉगव्दारे यू टयूबवर व्हायरल करताे. त्याच्या या चित्रफितींना मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळतात. यू ट्यूबवर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याला यू ट्यूबकडून काही रक्कम दिली जाते. ही रक्कम गोरगरिबांसाठी खर्च करण्याचा निर्णय त्याने घेतला. महाविद्यालयीन तरूण- तरूणींसाठी दुचाकी जिंकण्याची स्पर्धा, रिक्षावाल्यांचा विमा असे उपक्रम त्याने यापूर्वी राबवले. वाढदिवसाचे औचित्य साधून त्याने मुंबई-पुणे आणि कोल्हापूरमध्ये नाभिक बांधवांना मदत केली. कोल्हापुरातील मेळाव्यामध्ये नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार, चंद्रकांत संकपाळ, संतोष चव्हाण, विश्‍वास गंगधर, सरदार झेंडे उपस्थित होते. भविष्यातही समाजातील विविध घटकांसाठी मदतीचा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे कृष्णराजने सांगितले. यावेळी पिंटू संकपाळ, मनोज टिपुगडे, बाळासाहेब साळुंखे, संपत मर्दाने यांच्यासह नाभिक संघटनांचे पदाधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते.

१७०६२०२१ कोल कृष्णराज महाडिक

रेसर कृष्णराज महाडिक याने त्याला यू ट्यूबने दिलेल्या मानधनातून नाभिक समाजबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. यावेळी पृथ्वीराज महाडिक, सयाजी झुंजार, चंद्रकांत संकपाळ, संतोष चव्हाण, विश्‍वास गंगधर, सरदार झेंडे उपस्थित होते.

Web Title: Krishnaraj Mahadik's YouTube honorarium to the nuclear community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.