शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:18 IST

Kolhapur Municipal Election: कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत असून, खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक रिंगणात उतरणार आहेत. विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्यांना संधी मिळाली नव्हती. 

खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महापालिका निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृष्णराज महाडिक यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्यावेळी संधी मिळाली नाही. आता महापालिका निवडणुकीपासून त्यांनी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत असन, कृष्णराज महाडिक भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. आपल्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. 

मला पक्षाकडून आदेश मिळाले

एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले, "मला तिकीट मिळण्याच्या किंवा निवडणूक लढवण्याच्या प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबाचा कोणताही सहभाग नाही. हा आदेश मला पक्षाकडून मिळाला आहे."

"कोल्हापूर अशा लोकांच्या हातामध्ये पडले होते, ज्यांना वेगाने तिथे विकास करता आला नाही. आता आम्ही ते सगळं मोडून काढणार आहोत. मी याबद्दल फार उत्साही आहे. राजकारणात काम करण्याची इच्छा होती. भाजपाच्या माध्यमातून ते होणार आहे", असे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. 

कृष्णराज महाडिक कोणत्या प्रभागातून लढवणार निवडणूक?

"माझ्या कुटुंबाचा मला फार अभिमान आहे. आता तिसरी पिढी राजकारणामध्ये येत आहे. त्यामुळे फार चांगलं वाटत आहे. रुईकर कॉलनी, महाडिक कॉलनी. ज्या प्रभागामध्ये मी राहतो आणि माझे ऑफिस सुद्धा तिथेच आहे. माझे संपूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम आहेत, ते जे सगळे बघतात, ते त्याच ऑफिसमधून केले जातात", असे कृष्णराज महाडिक म्हणाले. 

महाडिक कॉलनीतील प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवणार आहे. माझी आता तयारी सुरू आहे. प्रभाग तीन पुरताच मर्यादित न राहता कोल्हापूर शहरासाठी काम करणार आहे. मागील दोन वर्षांपासून मी तिथे काम करत आहे. अनेक अडीअडचणी आहेत, ज्या सोडवण्यासाठी मला काम करायचे आहे", असेही ते म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Krishna Raj Mahadik to contest Kolhapur Municipal Corporation elections.

Web Summary : Krishna Raj Mahadik, son of Dhananjay Mahadik, will contest the Kolhapur Municipal Corporation election from Ward 3 as per BJP orders. He aims to develop Kolhapur and is excited to begin his political career through the BJP. He will work for the whole city.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा